​जॉनी लिव्हरला घरच्या परिस्थितीमुळे केवळ येवढेच शिक्षण घेता आले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 07:08 AM2017-10-25T07:08:59+5:302017-10-25T12:38:59+5:30

जॉनी लिव्हर आज बॉलिवूडमधील सगळ्यात चांगला कॉमेडीयन मानला जातो. गेल्या २५-३० वर्षांपासून तो एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला देत ...

Johnny Liver could only learn this because of the situation at home ... | ​जॉनी लिव्हरला घरच्या परिस्थितीमुळे केवळ येवढेच शिक्षण घेता आले...

​जॉनी लिव्हरला घरच्या परिस्थितीमुळे केवळ येवढेच शिक्षण घेता आले...

googlenewsNext
नी लिव्हर आज बॉलिवूडमधील सगळ्यात चांगला कॉमेडीयन मानला जातो. गेल्या २५-३० वर्षांपासून तो एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला देत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोलमान अगेन या चित्रपटात देखील एका खूप चांगल्या भूमिकेत आपल्याला जॉनी लिव्हरला पाहायला मिळाले आहे. जॉनी लिव्हर आज एक य़शस्वी विनोदी अभिनेता असला तरी त्याने हे यश मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल केले आहे. त्याच्या या स्ट्रगलविषयी त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने त्याच्या मुलाखतीत म्हटले होते की, मी माझ्या घरातील सगळ्यात मोठा मुलगा होतो. माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला सातवीतच शाळा सोडावी लागली. माझ्या वडिलांची कमाई खूप कमी असल्याने मी बाराव्या वर्षापासून नोकरी करायला सुरुवात केली. मी सहा वर्षं एका कंपनीत काम केले. तिथे मला खूपच कमी पैसे मिळायचे. पण कुटुंबाला हातभार लागतोय असा विचार करून मी हे काम करत होतो. मी लहानपणापासूनच आजूबाजूच्या लोकांना पाहून मिमिक्री करत असे. त्यामुळे नोकरी करत असतानाच मी मिमिक्री शो देखील करायला लागलो. असाच एक शो करताना कल्याणजी-आनंदजी यांना भेटण्याची मला संधी मिळाली. त्यांना माझी मिमिक्री खूप आवडल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत शो करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत परदेशातही शो करायला लागलो. १९८० पासून मी शो करत होतो. शो मध्ये लोकांना माझी मिमिक्री आवडत असली तरी मला चित्रपटात घ्यायला कोणी तयार नव्हते. १९९२ मध्ये मला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी अक्षरशः मला डोक्यावर घेतले. तोपर्यंत मला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. 
जॉनीला आज बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळाले असले तरी त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थिमुळे त्याला चांगले शिक्षण घेता आले नाही याची खंत त्याला आजही आहे. पण त्याने त्याच्या दोन्ही मुलांना आज खूप चांगले शिक्षण दिले आहे. 

Also Read : ​जॉनी लिव्हर यांनी कपिल शर्माच्या साथीलादाराला दिला मदतीचा हात,पार्टनरच्या रूपात येणार समोर

Web Title: Johnny Liver could only learn this because of the situation at home ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.