Johnny and Jamie Lever join Akshay’ Housefull 4 | जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी या चित्रपटात झळकणार एकत्र

जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी या चित्रपटात झळकणार एकत्र

ठळक मुद्देजॉनी आणि जॅमी हे हाऊसफुल ४ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील जॅमीची अधिकाधिक दृश्यं ही रितेश आणि अक्षय यांच्यासोबत आहेत. जॅमीचा अभिनय उत्तम व्हावा यासाठी ती चित्रीकरणाआधी वडिलांसोबत सराव करत आहे.

जॉनी लिव्हरला बॉलिवूडमधील महान कॉमिक अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्याने गेल्या अनेक वर्षांत मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. जॉनी लिव्हरला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. जॉनीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी जॅमी देखील या क्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. जॅमी देखील वडिलांप्रमाणे खूप चांगल्या कॉमेडी भूमिका साकारत असून तिच्या कॉमिक टायमिंगची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. आता पहिल्यांदाच जॉनी आणि जॅमी आपल्याला एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

हाऊसफुल या चित्रपटाच्या चौथ्या भागाचे सध्या जोरदार चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाच्या आजवरच्या भागांमध्ये आपल्याला अक्षय कुमार, रितेश देशमुख यांना पाहायला मिळाले आहे. आता हाऊसफुल ४ मध्ये यांच्यासोबतच बॉबी देओल, क्रीती सेनन, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा देखील आहेत आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जॉनी आणि जॅमी हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी जॅमीने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटातील जॅमीची अधिकाधिक दृश्यं ही रितेश आणि अक्षय यांच्यासोबत आहेत. या चित्रपटातील जॅमीचा अभिनय उत्तम व्हावा यासाठी ती चित्रीकरणाआधी वडिलांसोबत सराव करत आहे. 

हाऊसफुल 4 या चित्रपटात आपल्याला दोन काळ पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात बाहुबली या चित्रपटाचा काळ देखील दाखवला जाणार आहे. त्यामुळे व्यक्तिरेखांची रंगभूषा, वेशभूषा देखील तशाच प्रकारची असणार आहे. या चित्रपटात स्पेशल इफेक्टचा देखील मोठ्या प्रमाणाच वापर करण्यात आलेला आहे. या चित्रपटाचे काही चित्रीकरण लंडनमध्ये तर काही चित्रीकरण मुंबईत झालेले आहे. 

हाऊसफुल ४ या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण झाले असून केवळ काहीच चित्रीकरण शिल्लक असल्याचे कळतेय. या उरलेल्या काही दृश्यांसाठी संपूर्ण टीम लवकरच चित्रीकरण करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत असून दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. या चित्रपटाच्या एडिटिंग आणि व्हिज्युअल इफेक्टवर देखील सध्या काम सुरू आहे. या चित्रपटात बाहुबली फेम राणा दुग्गबती आणि चंकी पांडे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

 

Web Title: Johnny and Jamie Lever join Akshay’ Housefull 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.