'मुंबई सागा'मध्ये दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार जॉन अब्राहम, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:25 PM2021-03-16T20:25:06+5:302021-03-16T20:25:34+5:30

अभिनेता जॉन अब्राहम गँगस्टर ड्रामा मुंबई सागा चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

John Abraham will be seen in action in 'Mumbai Saga', find out about it | 'मुंबई सागा'मध्ये दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार जॉन अब्राहम, जाणून घ्या याबद्दल

'मुंबई सागा'मध्ये दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार जॉन अब्राहम, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम गँगस्टर ड्रामा मुंबई सागा चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. त्याच्यासाठी अ‍ॅक्शन सीन करणं एक आयटम साँग करण्यासारखे आहे. त्याने सांगितले की, त्याला मास ओरिएंटेड चित्रपटात काम करायला आवडते कारण जास्त प्रेक्षकांमुळे त्याच्या करिअरच्या कारकीर्दीत इथेपर्यंत पोहचला आहे. काही अभिनेत्यांना डान्स करायला आवडते. माझ्यासाठी अ‍ॅक्शन माझा डान्स आहे. हे आयटम साँगसारखे आहे.नुकतेच जॉन अब्राहमने गार्नियरकडून परिवर्तनीय ग्रीन ब्‍युटी उपक्रम सादरीकरणावेळी हजेरी लावली होती. जॉन गार्नियर इंडियाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आहे. यावेळी तो बोलत होता.

या उपक्रमाच्या सादरीकरणावेळी जॉन अब्राहम म्‍हणाला, ''मी दीर्घकाळापासून गार्नियर इंडियाशी सहयोगी राहिलेलो आहे. मला या उपक्रमाचे प्रतिनिधित्‍व करण्‍याचा अभिमान वाटत आहे. वर्षानुवर्षे आमच्‍या पर्यावरणीय संसाधनांचे परिणाम सातत्‍याने कमी करण्‍यासह आमचा दृढ विश्‍वास आहे की मोठ्या संघटित प्रयत्‍नांसाठी वैयक्तिक योगदानांमुळे  ध्‍येये संपादित करण्‍यामध्‍ये मदत होईल.'' 


'मुंबई सागा' चित्रपटात जॉन अब्राहम गँगस्टर अमर्त्य रावच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच प्रतीक बब्बर, रोहित रॉय, अंजना सुखानी आणि गुलशन ग्रोवरदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: John Abraham will be seen in action in 'Mumbai Saga', find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.