कोण आहे हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, तुम्ही त्याला ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 04:21 PM2019-04-06T16:21:21+5:302019-04-06T16:24:56+5:30

आपली रिल लाईफ आणि प्रोफेशन लाईफ वेगवेगळे ठेवणे पसंत करतो. त्याच्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही.

John Abraham turned into an old man for the Movie Romeo Akbar Walter Movie | कोण आहे हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, तुम्ही त्याला ओळखले का?

कोण आहे हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, तुम्ही त्याला ओळखले का?

googlenewsNext

कलाकार मंडळी आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतात. कधी वजन कमी करत तर कधी चक्क संपूर्ण आपला लूक बदलत ते रूपेरी पडद्यावर झळकतात. असाच खास प्रयत्न अभिनेता जॉन अब्राहमनेही त्याच्या  'रोमियो अकबर वॉल्टर' सिनेमात केला आहे. नुकतेच जॉनने त्याचा मेकींग व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.सुरूवातीला दिसणारा फोटो पाहून  तुम्हाला कुठेही हा जॉन असल्याचे समजणार नाही. या व्हिडीओत जॉनवर त्याची टीम प्रोस्थेटिक मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात अशा प्रकारचे मेकअप करत अभिनेते झळकले आहेत. याच यादीत जॉनचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे जॉनने हा व्हिडीओ शेअर केला तेव्हा सुरूवातीला फोटोची झलक पाहून त्याचे चाहतेही गोंधळे होते. हा लूक पाहून त्याच्या फॅन्सलाही त्याला ओळखणे कठीण झाले आहे. केवळ हालचालींवरून मी तुम्हाला ओळखु शकलो असेही एका युजरने म्हटले आहे. सिनेमातील  'RAW' साठी जॉनने गुप्तहेराचे ट्रांसफॉर्मेशन केले आहे. 'रोमियो अकबर वॉल्टर' सिनेमात जॉनसोबत मौनी रॉय, जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर, सुचित्रा कृष्णमूर्ती, बोमन ईरानी आणि गोविंद नामदेवदेखील महत्तावाच्या भुमिकेत आहेत. 5 एप्रिलला  हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

जॉन आपली रिल लाईफ आणि प्रोफेशन लाईफ वेगवेगळे ठेवणे पसंत करतो. त्याच्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी प्रिया ही सुद्धा लाईमलाईटपासून दूर राहते. अलीकडे एका मुलाखतीत जॉनने यामागचे कारण सांगितले.  ‘मला पापाराझी कल्चर अजिबात आवडत नाही. विशेषत: मी पत्नीसोबत क्वॉलिट टाईम घालवत असताना, मला ते अजिबात आवडत नाही. मी प्रायव्हेट पर्सन आहे आणि माझी पत्नी प्रिया ही माझ्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहे. तिची हीच गोष्ट मला सर्वाधिक आवडते. प्रिया सतत कामात बिझी असते. पण पडद्यामागे. सध्या ती माझी फुटबॉल टीम सांभाळतेय. एका टीमला हाताळणे कुठल्या प्रॉडक्शन टीमला हाताळण्यासारखे आहे,’असे त्याने सांगितले.

Web Title: John Abraham turned into an old man for the Movie Romeo Akbar Walter Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.