सलमान खानच्या राधेला टक्कर देणार या प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट, त्याच दिवशी होणार प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:37 PM2021-03-17T16:37:12+5:302021-03-17T16:41:44+5:30

सलमान खानचा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार हे कळल्यावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. पण सलमानसोबत आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होत आहे

john abraham satyameva jayate 2 clash with salman khan starrer radhe | सलमान खानच्या राधेला टक्कर देणार या प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट, त्याच दिवशी होणार प्रदर्शित

सलमान खानच्या राधेला टक्कर देणार या प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट, त्याच दिवशी होणार प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्देसत्यमेव जयते हा जॉन अब्राहमचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच सत्यमेव जयते 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट देखील 13 मे ला प्रदर्शित होणार आहे. 

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सलमानने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली होती. सलमानने 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यासोबत लिहिले होते की, ईदचे कमिटमेंट होते आणि ईदलाच येणार... कारण मी एकदा कमिटमेंट केली... हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच 13 मे ला प्रदर्शित होणार आहे...

सलमान खानचा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होणार हे कळल्यावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. पण सलमानसोबत आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपट 13 मे ला प्रदर्शित होत आहे. सत्यमेव जयते हा जॉन अब्राहमचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच सत्यमेव जयते 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट देखील 13 मे ला प्रदर्शित होणार आहे. 

सत्यमेव जयते 2 या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात पहिल्यांदाच जॉन डबल रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून दिव्या खोसला कुमार या चित्रपटात जॉनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सलमान खानच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Web Title: john abraham satyameva jayate 2 clash with salman khan starrer radhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.