ठळक मुद्देतूर्तास जॉन ‘पागलपंती’ या चित्रपटात बिझी आहे. अलीकडे या चित्रपटाच्या सेटवर जॉन जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियाच्या युगातही या माध्यमापासून अंतर राखून असलेले काही लोक आहेत. बॉलिवूडही याला अपवाद नाही. अभिनेता जॉन अब्राहम यातलाच. म्हणायला जॉन सोशल मीडियावर आहे. पण असूनही नसल्यासारखा. सोशल मीडिया लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधी देतो. पण जॉन यापासून लांब राहणे पसंत करतो. जॉन कधीच आपल्या खासगी आयुष्याशी निगडीत फोटो वा अन्य कुठलीही गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत नाही.

इन्स्टाग्रामवर जॉनचे आॅफिशिअल अकाऊंट आहेत. त्याच्याशी संबंधित अनेक पेजेसही आहेत. पण या अकाऊंटवर जॉनचे रोजचे ताजे फोटो क्वचित दिसतात. चित्रपटात जॉन शर्टलेस सीन्स देतो. पण सोशल अकाऊंटवर तो कधीच स्वत:चे शर्टलेस फोटो  शेअर करत नाही.  डब्बू रतनानीच्या फोटोशूटमुळे कधीकाळी त्याने स्वत:चे शर्टलेस फोटो शेअर केले होते. पण त्यानंतर त्याने असे कुठलेही फोटो शेअर केलेले नाहीत. निश्चितपणे यामागे कारण आहे. 


अलीकडे एका मुलाखतीत जॉन यावर बोलला. सोशल मीडियावर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता अधिक आहे, असे जॉनचे स्पष्ट मत आहे. ‘मी याबाबतीत एकदम स्पष्ट आहे. अनेक लोक हे आभासी जग खरे मानून वागतात, हे पाहून मी दु:खी होतो.  माझ्यासाठी मात्र सोशल मीडियाचे हे आभासी जग फार महत्त्वाचे नाही. स्पर्शाने अनुभवता येणा-या जगावर माझा विश्वास आहे,’असे जॉन यावेळी म्हणाला. त्यामुळे जॉ सोशल मीडियावर आहे. पण त्याच्या अकाऊंटवर बहुतेक प्राण्यांबद्दलची सुरक्षा, त्याबद्दलची जनजागृती किंवा चित्रपटाचे प्रमोशन अशाच पोस्ट तुम्हाला दिसतील. खासगी आयुष्याबद्दल याठिकाणी बोलणे त्याला आवडत नाही मग स्वत:चे शर्टलेस फोटो शेअर करणे तर दूरच.


तूर्तास जॉन ‘पागलपंती’ या चित्रपटात बिझी आहे. अलीकडे या चित्रपटाच्या सेटवर जॉन जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.


Web Title: john abraham not interested sharing shirtless pictures on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.