क्या बात! जॉन अब्राहमने प्राण्यांसाठी दान केली त्याची फेवरेट जिप्सी, फॅन्स म्हणाले - बडे दिलवाला स्टार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 01:13 PM2020-09-10T13:13:36+5:302020-09-10T13:16:43+5:30

जॉन अब्राहमकडे वेगवेगळ्या स्पोर्ट्स-लक्झरी कार असूनही त्याला मारूती जिप्सी जास्त आवडते. मात्र, जॉनने मोठं मन दाखवत त्याची फेवरेट मारूती सुझुकी जिप्सी कार डोनेट केलीय.

John Abraham donated gypsy to animal rescue organization wins heart | क्या बात! जॉन अब्राहमने प्राण्यांसाठी दान केली त्याची फेवरेट जिप्सी, फॅन्स म्हणाले - बडे दिलवाला स्टार...

क्या बात! जॉन अब्राहमने प्राण्यांसाठी दान केली त्याची फेवरेट जिप्सी, फॅन्स म्हणाले - बडे दिलवाला स्टार...

googlenewsNext

जॉन अब्राहम हा असा कलाकार आहे ज्याला बाइक्सची फार आवड आहे. बाइक्ससोबतच तो जिप्सीमध्ये फिरतो. त्याच्याकडे शानदार कार्स आणि बाइक्सचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या स्पोर्ट्स-लक्झरी कार असूनही त्याला मारूती जिप्सी जास्त आवडते. मात्र, जॉनने मोठं मन दाखवत त्याची फेवरेट मारूती सुझुकी जिप्सी कार डोनेट केलीय.

Aamtmindia एनजीओने याबाबतची माहिती त्यांच्या इन्स्टाग्रामवर पेजवर दिली आहे. त्यांच्यानुसार, अभिनेता जॉन अब्राहमने मारूती जिप्सी कार प्राण्यांसाठी दान दिली आहे. Animal Matter To Me या संस्थेला त्याने ही त्याची फेवरेट जिप्सी सोपवली आहे. ही संस्था या जिप्सीचा वापर महाराष्ट्रातील कोलाडमध्ये जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या एनिमल सेंचुरीमध्ये करतील. इथे मेडिकलचं सामान आणण्यासाठी आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी या जिप्सीचा वापर होईल.

जॉनच्या फॅन्सनी त्याच्या मोठ्या मनाबाबत त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. लोकांनी जॉनचं कौतुक करताना तो मोठ्या मनाचा माणूस असल्याचं म्हटलं आहे. 

हे पण वाचा :

CoronaVirus : सडके है लावारिस, घर पर बैठा इन्सान है... ऐका जॉन अब्राहमची अंगावर शहारे आणणारी कविता

जॉन अब्राहमच्या पत्नीने शेअर केले त्यांच्या लग्नातील काही खास फोटो, पाहा त्यांचे रोमँटिक फोटो

Web Title: John Abraham donated gypsy to animal rescue organization wins heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.