जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 06:02 PM2021-02-02T18:02:30+5:302021-02-02T18:03:00+5:30

जॉन अब्राहम सध्या आपल्या आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

John Abraham is a busy man, the actor has no time for 'Pathan' | जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ

जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'पठाण'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. मात्र, जॉन अब्राहमला पठाण चित्रपटाचे शूट पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही. 

जॉन अब्राहम सध्या आपल्या आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आता जॉन २०२१ मध्ये पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
जॉन आपल्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर परत आला आहे. 'सत्यमेव जयते'चे शूटिंग संपवून तो 'अटॅक'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत पूर्ण करण्यात येणार आहे.

जॉनचे चित्रपटांच्या शूटिंगचे वेळापत्रक एवढे व्यग्र आहे की, त्याला शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ मिळत नाही. जॉन मार्चमध्ये शाहरुख आणि दीपिकासमवेत दुबईला जाणार आहे, जेथे तो पठाणचे शेवटचे वेळापत्रक पूर्ण करेल. त्याचबरोबर हेही बोलले जात आहे की, पठाण चित्रपटाचे शूट जॉनमुळेच लांबणीवर जात आहे. कारण जॉनने चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू केलेले नाही.


‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.मे महिन्यात 12 तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: John Abraham is a busy man, the actor has no time for 'Pathan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.