ठळक मुद्देसोशल मीडियावर २७ मे रोजी अचानक #JCBKiKhudayi ट्रेंड होऊ लागला. यानंतर सोशल मीडियावर #JCBKiKhudayi वरच्या जोक्सचा पूर आला.

प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल झाली होती. अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम सगळीकडे जेसीबी मशीनवर बसलेले मीम्स आणि जाक्स व्हायरल होत आहे. आता हे ‘जेसीबी की खुदाई’ची खुदाई काय प्रकरण आहे, हे जरा जाणून घ्या. या प्रकरणाची सुरुवात झाली ती सनी लिओनी हिच्यापासून. होय, बॉलिवूडची ग्लॅम डॉल सनी लिओनी हिच्यापासून.
होय, सनी लिओनीने जेसीबी मशीनच्या टायरवर चढून फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तिच्या या फोटोनंतर काहीच क्षणात #JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. ‘जेसीबी की खुदाई’ या हॅशटॅगखाली अनेक व्हिडीओ, फोटो मीम्स व्हायरल होऊ लागलेत. हे व्हिडीओ, मीम्स इतके भन्नाट आहेत की, हसून हसून तुमचे पोट दुखेल.   

कसा सुुरू झाला ट्रेंड
सोशल मीडियावर २७ मे रोजी अचानक #JCBKiKhudayi ट्रेंड होऊ लागला. यानंतर सोशल मीडियावर #JCBKiKhudayi वरच्या जोक्सचा पूर आला. युट्युबवरचे काही जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामाचे व्हिडीओ हेही याचे एक कारण आहे. या व्हिडीओला २ कोटींपर्यंतचे व्ह्युज आहेत. याचमुळे हा ट्रेंड सुरु झाला. युजर्सनी असे जोक्स शेअर केलेत की, तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.Web Title: #JCBKiKhudayi !! jcb ki khudai meme video viral on internet after sunny leone shares jcb photo on -instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.