Jayalalitha's biopic named 'This' Bollywood Actress with Anushka Shetty | जयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत
जयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत

ठळक मुद्देएनटीआरनंतर जयललिता यांच्या आयुष्यावर सिनेमा येत असल्याची चर्चा आहे या सिनेमाचे नाव 'अम्मा' असल्याचे समजतेय

गेल्या काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक बायोपिकला पसंतीसुद्धा देतायेत. नुकताच संजूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. संजूने बॉक्स ऑफिसवर आपला जबरदस्त कमाल दाखवला. साऊथचे सुपरस्टार एनटीआर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे. त्यातच आता साऊथच्या आणखीन एक सुपरस्टार अभिनेत्रीवर सिनेमा तयार करण्यात.   


एनटीआरनंतर जयललिता यांच्या आयुष्यावर सिनेमा येत असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचे नाव 'अम्मा' असल्याचे समजतेय. मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल अॅवॉर्ड विनिंग विजेता पी भारतीराजा आणि निर्माता आदित्य भारव्दाज मिळून हा सिनेमा तयार करण्याचा फायनल केले आहे. इलय्याराज या सिनेमाचे संगीत देणार आहेत. प्री-प्रोडक्शनचे काम संपले  आहे. डिसेंबरपर्यंत या सिनेमाची शूटिंग सुरु होईल.  अम्मा यांची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शेट्टी आणि ऐश्वर्या राय बच्चनला अप्रोच करण्यात आले आहे. टाईम्सला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान आदित्यने सांगितले की ऐश्वर्या आणि अनुष्का दोघींना यासिनेमासाठी अप्रोच करण्यात आले आहे.तर कमल हसन आणि मोहनलाल यांना एमजीआर यांच्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आले आहे.  


जयललिता यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 5 डिसेंबर 2016मध्ये चेन्नईमध्ये त्यांचं निधन झालं. एक यशस्वी अभिनेत्री ते राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. जयललिता यांची भूमिका मोठ्या पडद्यावर कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ऐश्वर्या आणि अनुष्कामध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला लवकरच कळेल.  


Web Title: Jayalalitha's biopic named 'This' Bollywood Actress with Anushka Shetty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.