कंगना राणौतचा चित्रपट वादात, जे. जयललितांची भाची हायकोर्टात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:29 PM2019-11-01T14:29:22+5:302019-11-01T14:34:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत या बायोपिकमध्ये जयललितांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. पण एएल विजय दिग्दर्शित हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे.

jayalalithaa niece deepa approached madras high court stay on kangana ranaut starrer biopic | कंगना राणौतचा चित्रपट वादात, जे. जयललितांची भाची हायकोर्टात!!

कंगना राणौतचा चित्रपट वादात, जे. जयललितांची भाची हायकोर्टात!!

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रपटात जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चार फेज दाखवल्या जाणार आहेत.

तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची घोषणा झाली आणि हा चित्रपट चर्चेत आला. ‘थलायवी’ असे या बायोपिकचे नाव आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत या बायोपिकमध्ये जयललितांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. पण एएल विजय दिग्दर्शित हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. होय, जयललिता यांची भाची जे. दीपा यांनी मद्रास हायकोर्टाचा दरवाजा ठोठावत, या आगामी बायोपिकला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.




टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेल्या संबंधित चित्रपटावर जे. दीपा यांनी आक्षेप नोंदवला आहे. सोबतच एका वेबसीरिजवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
सध्या कंगना या चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे. सप्टेंबर महिन्यात कंगनाने सोशल मीडियावर या तयारीचे काही फोटोही शेअर केले होते. या फोटोंमध्ये कंगना प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसली होती. याच मेकअपच्या आधारे ती जयललितांचा गेटअप घेणार आहे.

चित्रपटात जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चार फेज दाखवल्या जाणार आहेत, ज्यामध्ये त्यांची चित्रपट अभिनेत्रीपासून ते तामिळनाडूच्या सीएम बनण्यापर्यंतची कहाणी दाखवली गेली आहे. यामध्ये सर्वात जास्त इंटरेस्टिंग तिची लास्ट फेज असणार आहे, ज्यासाठी कंगनाच्या चेहºयावर एक्स्ट्रा प्रोस्थेटिकची गरज पडेल. कारण दोघींच्याही चेह-याचा आकार वेगवेगळा आहे.
‘थलायवी’ चे शूटिंग याचवर्षी नोव्हेंबरपासून सुरु होईल. जो तमिळ, तेलगु आणि हिंदीमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार आहे. तर चित्रपटाची कथा के व्ही विजय प्रसादने लिहिली आहे.

Web Title: jayalalithaa niece deepa approached madras high court stay on kangana ranaut starrer biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.