करण जोहरच्या 'Takht'मध्ये जान्हवी कपूर करणार रणवीर सिंगसोबत रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:48 PM2018-09-25T16:48:54+5:302018-09-25T16:57:09+5:30

करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा तख्त रिलीजच्या आधीपासूनच चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुक आहे. या सिनेमात आता आणखीन एक नाव जोडले गेले आहे ते आहे जान्हवी कपूरचे.

Janvahi kapoor will.do romance with ranveer singh in karan johars movie 'Takht' | करण जोहरच्या 'Takht'मध्ये जान्हवी कपूर करणार रणवीर सिंगसोबत रोमान्स!

करण जोहरच्या 'Takht'मध्ये जान्हवी कपूर करणार रणवीर सिंगसोबत रोमान्स!

googlenewsNext
ठळक मुद्दे रणवीर सिंगच्या अपोझिट जान्हवी कपूरला कास्ट करण्यात आले आहेआलिया भट्टची विकी कौशलसोबत जोडी जमणार आहे

करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा तख्त रिलीजच्या आधीपासूनच चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुक आहे. या सिनेमात आता आणखीन एक नाव जोडले गेले आहे ते आहे जान्हवी कपूरचे.  रणवीर सिंगच्या अपोझिट जान्हवी कपूरला कास्ट करण्यात आले आहे. पहिल्यांदाच जान्हवी आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्टची विकी कौशलसोबत जोडी जमणार आहे.


 ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. जान्हवी रणवीर सिंगच्या प्रेयसीची तर करीना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. आलिया भट्ट विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. ‘धडक’नंतर जान्हवीचा हा दुसरा चित्रपट असेल. या मल्टीस्टारर चित्रपटाचे संवाद हुसैन हैदरी लिहिणार आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ‘कलंक’ या चित्रपटानंतर ‘तख्त’ हा करण जोहरचा दुसरा पीरियड ड्रामा असेल.
 

Web Title: Janvahi kapoor will.do romance with ranveer singh in karan johars movie 'Takht'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.