जान्हवी कपूरने बहिणीच्या चेह-यावर केले पेंटिंग, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:09 PM2020-03-20T16:09:18+5:302020-03-20T16:10:55+5:30

तुम्हीही पोट धरून हसाल....

janhvi kapoor spends quality time with sister khushi kapoor due to coronavirus outbreak-ram | जान्हवी कपूरने बहिणीच्या चेह-यावर केले पेंटिंग, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

जान्हवी कपूरने बहिणीच्या चेह-यावर केले पेंटिंग, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

googlenewsNext
ठळक मुद्देखुशी न्यूयॉर्कमध्ये तिचे ग्रॅज्यूएशन पूर्ण करतेय.

कोरोना व्हायरसमुळे न्यूयॉर्कमध्ये हेल्थ इमर्जन्सी लागू झाल्याने जान्हवी कपूरची बहीण खूशी कपूर भारतात परतली. भारतातही कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे  खुशी व जान्हवी दोघींनीही घरात स्वत:ला कोंडून घेतले आहे. अशात वेळ कसा घालवणार? जान्हवीने यावर एक मस्त पर्याय शोधून काढलाय. होय, तो काय तर खुशीच्या चेह-यावर पेंटिंग.
होय, जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोन्ही बहिणी घरात क्वॉरेंटाइनचा काळ कसा घालवत आहेत हे पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये  खुशीच्या चेह-यावर पेंटिंग करताना दिसतेय.  त्यांच्या काही मैत्रिणी खुशीला हसत हा व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. दुस-या एका व्हिडीओमध्ये खुशी नुडल्स खाताना दिसत आहे.


 जान्हवी कपूरने ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवीनंतर तिची बहीण खुशी देखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे म्हटले जात होते. पण सध्या तरी खुशी तिचे शिक्षण पूर्ण करतेय.

खुशी न्यूयॉर्कमध्ये तिचे ग्रॅज्यूएशन पूर्ण करतेय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र मोठ्या बहिणीप्रमाणे ती सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच प्रतिसाद देतात. तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून ती अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी बहीण जान्हवीसोबत दिसते.  

Web Title: janhvi kapoor spends quality time with sister khushi kapoor due to coronavirus outbreak-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.