Filmfare Awards 2019: जान्हवी कपूर थिरकणार दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:57 PM2019-03-23T18:57:50+5:302019-03-23T18:58:54+5:30

जान्हवी कपूर या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहे.

Janhvi Kapoor preps for her first act for the 64th Vimal Filmfare Awards | Filmfare Awards 2019: जान्हवी कपूर थिरकणार दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर

Filmfare Awards 2019: जान्हवी कपूर थिरकणार दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देजान्हवी कपूर दीपिका पादुकोणच्या पद्मावत या चित्रपटातील घुमर या प्रसिद्ध गाण्यावर थिरकणार आहे.

फिल्मफेअर पुरस्काराची वाट बॉलिवूडमधील मंडळी आणि प्रेक्षक वर्षभर पाहात असतात. हा पुरस्कार सोहळा २३ मार्चला म्हणजेच आज मुंबईतील जिओ गार्डन येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा काहीच तासांत सुरू होणार असून या पुरस्कार सोहळ्यात कोण विजेता ठरेल हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बधाई हो, राझी, अंधाधुन, संजू, पद्मावत या चित्रपटांना सगळ्यात जास्त नामांकनं मिळाली आहेत. 

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे हे 64 वं वर्षं असून या पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलिवूडमधील कलाकार आपले दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील परफॉर्मन्स चांगला असावा यासाठी अनेक कलाकार सध्या मेहनत करत आहेत. आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून ते कित्येक तास तालमी करत आहेत. कलाकारांच्या तालमीचे फोटो आणि व्हिडिओ फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत काही कलाकारदेखील आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2019 चे सूत्रसंचालन बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान करणार असून त्याला विकी कौशल, जान्हवी कपूर, राजकुमार राव यांसारख्या नव्या पिढीतील कलाकारांची साथ लाभणार आहे. लोकांना खळखळून हसवण्यासोबतच ही नवी पिढी त्यांचे परफॉर्मन्स देखील सादर करणार आहे. 

जान्हवी कपूर या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहे. जान्हवी कपूर दीपिका पादुकोणच्या पद्मावत या चित्रपटातील घुमर या प्रसिद्ध गाण्यावर थिरकणार आहे. श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

जान्हवी प्रमाणेच नोरा फतेही देखील या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करणार आहे. राजकुमार रावच्या स्त्री या चित्रपटातील कमरिया या गाण्यावर ती नृत्य सादर करणार आहे. 

Web Title: Janhvi Kapoor preps for her first act for the 64th Vimal Filmfare Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.