नाईट पार्टीमध्ये जान्हवीने तरुणासोबत साधली जवळीकता; जाणून घ्या कोण आहे 'हा' मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:51 AM2022-05-11T11:51:44+5:302022-05-11T11:52:23+5:30

Janhvi kapoor: जान्हवीने या नाईट पार्टीमधील काही फोटोंचा कोलाज करुन ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांचं लक्ष फक्त जान्हवी व तिच्यासोबत असलेल्या तरुणाकडेच वेधलं आहे.

janhvi kapoor gets cozy in late night party with rumoured boyfriend orhan | नाईट पार्टीमध्ये जान्हवीने तरुणासोबत साधली जवळीकता; जाणून घ्या कोण आहे 'हा' मुलगा

नाईट पार्टीमध्ये जान्हवीने तरुणासोबत साधली जवळीकता; जाणून घ्या कोण आहे 'हा' मुलगा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सुरुवातीच्या काळात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक म्हणून ओळखली जात होती. मात्र, उत्तम अभिनयशैली आणि ग्लॅमरस लाइफस्टाइल यामुळे जान्हवीने कलाविश्वात आणि चाहत्यांच्या मनात स्वतंत्र हक्काचं स्थान निर्माण केलं. जान्हवी गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि  पार्टीजमुळे चर्चेत येत आहे. यावेळीदेखील ती अशाच एका नाईट पार्टीमुळे चर्चेत आली आहे. या पार्टीमध्ये ती एका तरुणाच्या जास्तच जवळ जात असल्याचं निदर्शनास आलं. तेव्हापासून हा तरुण नेमका कोण आहे याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर जान्हवीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये  जान्हवी एका नाईट पार्टीमध्ये सहभागी झाली असून तिचे एका मुलासोबतचे असंख्य फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या मुलासोबत जान्हवी खूपच क्लोज असल्यामुळे तो कोण असावा हे जाणून घेण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

जान्हवीच्या क्लोज असलेला तरुण आहे तरी कोण?

जान्हवीने या नाईट पार्टीमधील काही फोटोंचा कोलाज करुन ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांचं लक्ष फक्त जान्हवी व तिच्यासोबत असलेल्या तरुणाकडेच वेधलं आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या तरुणाचं नाव ओरहान (Orhan) असं आहे. ओरहान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तो कायम स्टारकिड्ससोबतचे फोटो शेअर करत असतो. ओरहान हा जान्हवीचा जवळचा मित्र असून सुहाना खान, न्यासा यांचाही तो चांगला मित्र आहे.

यापूर्वीही जान्हवी-ओरहानचे फोटो झालेत व्हायरल

या नाईट पार्टीपूर्वीही जान्हवी आणि ओरहानला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. यापूर्वी या दोघांचा एका डान्स पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दरम्यान, जान्हवी लवकरच 'गुड लक जेरी' या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. त्यानंतर आता ती 'मिस्टर अँड मिसेस माही' या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे.

Web Title: janhvi kapoor gets cozy in late night party with rumoured boyfriend orhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.