OMG!! जान्हवी कपूरने कारमध्येच बदलले कपडे, स्वत: शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:13 PM2021-03-11T12:13:32+5:302021-03-11T12:14:10+5:30

जानूवर का आली कारमध्येच कपडे बदलण्याची वेळ?

janhvi kapoor change her jeans in car photos viral | OMG!! जान्हवी कपूरने कारमध्येच बदलले कपडे, स्वत: शेअर केले फोटो

OMG!! जान्हवी कपूरने कारमध्येच बदलले कपडे, स्वत: शेअर केले फोटो

googlenewsNext
ठळक मुद्दे‘रूही’ची कहाणी एका चेटकिणीची आहे, जिची लग्न सोहळा असणा-या घरांवर नजर आहे.

जान्हवी कपूरचा ‘रूही’ हा सिनेमा आज 11 मार्चला रिलीज झालाये. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने कुठलीही कसर सोडली नाही. एका दिवशी अगदी दोन-दोन, तीन-तीन इव्हेंट केलेत. इतकेच काय, अगदी गाडीत ड्रेसही चेंज केला. होय, वेळेअभावी जानूवर कारमध्येच कपडे बदलण्याची वेळ आली. खुद्द जान्हवीने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या पहिल्या पोटोमध्ये जान्हवी ग्लमरस लूकमध्ये दिसतेय. एका फोटोमध्ये तिने स्ट्रॅपलेस टॉपवर ओवरसाइज बो आणि हाय वेस्ट मिनी स्कर्ट परिधान केला आहे आणि दुस-या फोटोमध्ये काय तर कारमध्ये जान्हवी जीन्स घालण्याचा प्रयत्न करताना दिसतेय आणि तिस-या फोनमध्ये जान्हवी विमानाच्या सीटवर थकलेली बसलेली दिसतेय. ‘हा अत्यंत आरामदायी दिवस होता’, असे उपरोधिकपणे तिने लिहिले आहे.

आता हा सगळा खटाटोप कशासाठी? तर  प्रमोशनल इवेंटनंतर लगेच  जान्हवीला फ्लाइट पकडायची होती. त्यामुळे तिला कॅज्युअल कपडे परिधान करायचे होते. पण हाताशी वेळ नव्हता. अखेर तिने कारमध्येच कपडे बदलून कशीबशी फ्लाईट पकडली. 

‘रूही’ची कहाणी एका चेटकिणीची आहे, जिची लग्न सोहळा असणा-या घरांवर नजर आहे. नवरदेव झोपला की, ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्वीकारतात. यासाठी दोघही जान्हवीला पळवून नेतात आणि तिच्या आतून चेटकीण बाहेर कढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे.  दिनेश विजन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. याआधी राजकुमार व दिशेन विजान या दोघांनी ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकुमार राव ‘स्त्री’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

Web Title: janhvi kapoor change her jeans in car photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.