Janhavi Kapoor expressed the desire | जान्हवी कपूरने व्यक्त केली ही इच्छा
जान्हवी कपूरने व्यक्त केली ही इच्छा

ठळक मुद्देजान्हवी कपूर झळकणार तख्तमध्येजान्हवीचे आवडते दिग्दर्शक व अभिनेते गुरूदत्त


अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता इशान खट्टर होता. या दोघांच्याही कामाचे खूप कौतूक झाले. या चित्रपटानंतर जान्हवी करण जोहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्ये दिसणार आहे. तसेच त्याने तिला त्याच्या बायोपिकमध्ये देखील घेतले असल्याचे बोलले जात आहे. जान्हवीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

जान्हवी कपूरची आई व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीनेही हिंदी सिनेमा करण्यापूर्वी अनेक तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले होते. हिंदीमध्ये यशस्वी होण्यापूर्वी श्रीदेवीने दक्षिणेत सुपरस्टार अशी ओळख मिळवली होती. आता आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून जान्हवीलाही दक्षिणेतल्या सिनेमांची ओढ लागून राहिली आहे. त्यासाठी तिने आपली इच्छा बोलूनही दाखवली आहे. दक्षिणेतल्या मल्याळम सिनेमात काम करायची संधी मिळायला हवी, असे तिने म्हटले आहे. त्यासाठी केवळ स्क्रीप्ट चांगली असायला हवी, ही एकच अट तिने निश्‍चित केली आहे.
जान्हवीला जुने चित्रपट खूप आवडतात. गुरुदत्त हे तिचे सर्वात आवडते अभिनेते व दिग्दर्शक आहेत. एकाच भाषेच्या सिनेमात मला काम करायचे नाही आहे. त्यामुळे माझ्यासमोर विविध भाषांचे पर्याय खुले झाले आहेत. सुदैवाने स्टार किड असल्याने तिच्यासमोर निर्माते दिग्दर्शकांच्या निवडीचा प्रश्‍न फारच क्‍वचित येऊ शकतो. तिचे पप्पा बोनी कपूर यांनीही आपल्या लाडक्‍या कन्येसाठी भविष्यात चांगला सिनेमा प्रोड्युस करायचे ठरवले आहे. मात्र असे असले तरी आपली तुलना आई, श्रीदेवीबरोबर केली जाऊ नये, असे जान्हवीला वाटते. 


Web Title: Janhavi Kapoor expressed the desire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.