Jahnavi Kapoor's Belly Dance Video Viral, The Rocking Style | जान्हवी कपूरचा बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल, पाहायला मिळाला रॉकिंग अंदाज
जान्हवी कपूरचा बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल, पाहायला मिळाला रॉकिंग अंदाज

जान्हवी कपूरने नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसतेय. जान्हवीचा हा व्हिडीओ अपलोड होताच खूप व्हायरल होत आहे. मुळात व्हिडीओतील जान्हवीचा रॉकींग अंदाज रसिकांच्या अधिक पसंतीस पात्र ठरतो आहे. विशेष म्हणजे जान्हवी हा बेली डान्स कोणत्या बॉलिवूड गाण्यावर करत नसून रिअॅलिटी शो डान्स दिवानेच्या टायटल ट्रॅकवर करत आहे. तिने अशा प्रकारे बेली डान्स करण्याची कल्पना दिग्दर्शक शशांक खेतानने सुचवली त्याच्याच सांगण्यावरून जान्हवीने बेली डान्सचा व्हिडीओ बनवत तो चाहत्यांसह शेअर केला. या व्हिडीओत तिचा स्पोर्टी लूकबरोबर तिचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळत आहे. 


जान्हवी सध्या नवनवीन गोष्टी शिकण्यात बिझी असली तरी दुसरीकडे 'तख्त' सिनेमाच्या शूटिंगमध्येही ती बिझी आहे. या सिनेमात जान्हवीसह रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर आणि विक्की कौशलही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तख्त सिनेमाबरोबरच जान्हवीच्या हाती आणखीन एक सिनेमा लागला आहे.  ‘रूहअफ्जा’ सिनेमात ती झळकणार आहे. विशेष म्हणजे जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार आहे. 'रूही' आणि 'अफ्जा' असे दोन रोल ती साकारताना दिसेल.

 

ही माहिती खुद्द जान्हवीने सोशल मीडियावर दिली होती. पहिल्यांदाच जान्हवी राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत झळकणार आहे. सध्या  ‘रूहअफ्जा’चे शूटींग सुरु झाले असून २० मार्च २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. दिशेन विजान निर्मित सिनेमा हॉरर-कॉमेडी असणार आहे. सिनेमा वेगळ्या जॉनरचा असल्यामुळे जान्हवीचा अंदाज निराळाच असणार हे मात्र नक्की.


Web Title: Jahnavi Kapoor's Belly Dance Video Viral, The Rocking Style
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.