जॅग्वार ते रॉल्स रॉयस कारपर्यंत, बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या महागड्या गिफ्ट्सच्या किंमती ऐकून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 07:11 PM2019-12-25T19:11:34+5:302019-12-25T19:13:04+5:30

बॉलिवूडमधील फक्त सुपरस्टार्सच नाही तर असेही कित्येक सेलिब्रेटी आहेत जे एकमेकांना महागडे गिफ्ट देताना दिसतात.

From Jaguar to Rolls Royce Cars, Bollywood celebs gives expensive gifts to each other | जॅग्वार ते रॉल्स रॉयस कारपर्यंत, बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या महागड्या गिफ्ट्सच्या किंमती ऐकून व्हाल अवाक्

जॅग्वार ते रॉल्स रॉयस कारपर्यंत, बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या महागड्या गिफ्ट्सच्या किंमती ऐकून व्हाल अवाक्

googlenewsNext


बॉलिवूडमधील फक्त सुपरस्टार्सच नाही तर असेही कित्येक सेलिब्रेटी आहेत जे एकमेकांना महागडे गिफ्ट देताना दिसतात. नुकतेच टेलिव्हिजनची क्वीन निर्माती एकता कपूरने आगामी चित्रपट ड्रीम गर्लचे दिग्दर्शक राज शांडिल्यला चक्क ९० लाखांची कार गिफ्ट म्हणून दिली. त्याला दिेलेली जॅग्वॉर गाडी पाहून चाहते अवाक झाले. एकता कपूरशिवाय हे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आहेत जे महागडे गिफ्ट देताना दिसतात. 

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या अग्निपथ चित्रपटातील कतरिना कैफवर चित्रीत झालेलं चिकनी चमेली गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.  कतरिनाच्या या चित्रपटातील कामावर करण जोहर खूश झाला होता आणि त्याने कतरिनाला फरारी भेट दिली होती. या चित्रपटानंतर करण आणि कतरिनामधील मैत्रीचं नात अधिक घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं.

विधु विनोद चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांची केमिस्ट्री अजब आहे. चोप्रा आपल्या एकलव्य सिनेमातील अमिताभ यांचा अभिनय पाहून भारावून गेले होते. त्यांनी अमिताभ बच्चन यांना ३.५ कोटी रुपयांची रॉल्स रॉयस कार भेट म्हणून दिली होती. बिग बींनीदेखील मोठ्या आनंदानं ही भेट स्वीकारली होती. या कारची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती.

सिद्धार्थ मल्होत्राने आपली खास मैत्रिण आलिया भटला तिच्या २२ व्या वाढदिवसानिमित्तानं खास गिफ्ट दिलं होतं. या गिफ्टची आलियाच्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगली होती. हे गिफ्ट खास अमेरिकतून मागवण्यात आलं होतं. हाई एंड डिवाइस आलियाला फोटोग्राफीसाठी सिद्धार्थ मल्होत्राने दिलं असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने किंग खान शाहरुखच्या मुलाला ई-सायकल भेट दिली आहे. सलमान खानने एनजीओ ब्रॅण्ड बिइंग ह्युमनची ई-सायकल शाहरुखचा लहान मुलगा अबराम खानला भेट दिली आहे. याबाबत सलमान खानने दस का दम शोमध्ये सांगितलं होतं.

सलमान खान आपल्या अभिनयासोबतच एक उत्तम चित्रकारही आहे. तो आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या हाताने रेखाटलेली चित्र गिफ्ट करतो. किक चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडीस या दोघांनीही एकत्र काम केलं होतं. जॅकलिन सलमानची खास मैत्रीण असल्यानं तिला स्वत:च्या हातांनी रेखाटलेलं सुंदर चित्र सलमाननं गिफ्ट म्हणून दिलं आहे. या पेंटिंगची किंमत बाजारात जवळपास अडीच कोटी रुपये आहे. 


 

Web Title: From Jaguar to Rolls Royce Cars, Bollywood celebs gives expensive gifts to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.