अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार ही श्रीलंकन बाला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 10:48 AM2019-03-18T10:48:33+5:302019-03-18T10:51:20+5:30

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय.

jacqueline fernandez to star opposite akshay kumar in rohit shettys sooryavanshi | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार ही श्रीलंकन बाला!!

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार ही श्रीलंकन बाला!!

googlenewsNext
ठळक मुद्देया अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय सूर्यवंशी नावाचे पात्र साकारताना दिसेल. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा ‘केसरी’ पुढील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरीकडे त्याचा दुसरा चित्रपट ‘सूर्यवंशी’चे शूटींगही जोरात सुरू आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित व अक्षयच्या ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक प्रदर्शित केले होते. तथापि या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. होय, चर्चा खरी मानाल तर ‘सूर्यवंशी’मध्ये श्रीलंकन बाला जॅकलिन फर्नांडिसची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अक्षय व जॅकची जोडी दिसेल, याची शक्यता अधिक आहे.  २०१६ मध्ये प्रदर्शित ‘हाऊसफुल 3’मध्ये ही जोडी  दिसली होती. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. विशेषत: अक्षय व जॅकची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे जॅकने ‘सूर्यवंशी’साठी होकार दिलाच तर ही जोडी पुन्हा एकदा धूम करेल, यात शंका नाही.


या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय सूर्यवंशी नावाचे पात्र साकारताना दिसेल. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा  होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता. ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता. 

Web Title: jacqueline fernandez to star opposite akshay kumar in rohit shettys sooryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.