ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करणा-या अभिनेत्री कधी आगळ्या वेगळ्या रूपात दिसल्या तर त्यांना ओळखणे जरा कठिणच, असेच काहीसे जॅकलिनबरोबर घडले आहे. एरव्ही ग्लॅमरस अंदाजात दिसणारी जॅकलिन अचानक सलवार कुर्ता ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये यावेळी तिला कोणीच ओळखले नाही. अगदी साधी हेअर स्टाईल तिने केली होती. त्यामुळे तिच्या स्टाइलवरून कोणालाच वाटले नाही की तो कोणी बॉलिवूड अभिनेत्री असेन. काहींना तिचा हा अंदाज पाहून नाराजी व्यक्त केली तर काही तिचे कौतुक करताना दिसतायेत.  


इतकेच काय तर सोशल मीडियावर तिचा हा फोटो व्हायरल होताच तिच्या फॅन्सनेही या फोटोवर संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. फोटोत ऑरेंज आणि गोल्डन कलर  कॉम्बिनेशन असलेला सलवार-सूट तिने घातल्यामुळे ती ग्लॅमरस दिसत नाहीय. तर काहींनी म्हटले आहे की, सारा अली खान एकमेव अभिनेत्री आहे जी करिअरच्या सुरूवातीपासूनच सलवार सूटमध्ये फिरताना दिसली. तिचा तो अंदाज सा-यांनाच पसंत पडतो. सारा अली खानची ड्रेसिंग स्टाइल इतर अभिनेत्री कॉपी करताना दिसतायेत. त्यामुळे जॅकलिननेही सलवार सूट घातला असावा अशा कमेंटस सध्या तिच्या या फोटोंवर उमटत आहेत.

जॅकलिन प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो' सिनेमात झळकणार आहे. सगळ्यात महागडा एक्शन सिनेमा असून 350कोटी रू. इतका खर्च सिनेमावर केला आहे.  या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धा कपूरही दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत डेब्यू करत आहे. तर जॅकलिनेही सिनेमासाठी 2 करोड इतके मानधन घेतले आहे. सध्या प्रभास सिनेमात असल्यामुळे रसिकांमध्येही 'साहो' सिनेमाची उत्सुकता  पाहायला मिळत आहे. 


Web Title: Jacqueline Fernandez looks gorgeous in salwar kameez
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.