बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीवर आली तोंड लपवत फिरण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:06 PM2019-07-16T13:06:01+5:302019-07-16T13:12:50+5:30

बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये म्हणून तिची ओळख आहे. नुकतीच ती कपड्याना चेहरा लपवताना दिसली.

Jacqueline fernandez gets snapped hiding her face with cloth video viral | बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीवर आली तोंड लपवत फिरण्याची वेळ

बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीवर आली तोंड लपवत फिरण्याची वेळ

googlenewsNext

बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये म्हणून तिची ओळख आहे. नुकतीच जॅकलिन कपड्याने चेहरा लपवताना दिसली. आम्ही बोलतोय,  श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसबदल.  सोशल मीडियावर जॅकचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पिंक रंगाच्या कपड्याने जॅकलिन चेहरा लपवताना दिसतेय.  जॅकचा हा व्हिडीओ बघून तिचे फॅन्स चांगलेच हैराण झाले आहेत. या व्हिडीओला खूप पसंती मिळेत. हा व्हिडीओ बघून अनेक तर्क-विर्तक लावण्यात येत आहेत. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार जॅकने प्लास्टिक सर्जरी केली आहे. मात्र अद्याप याबाबतचा काही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात येण्याचे निमित्त झाले आणि ती इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला.जॅकलिन श्रीलंकेची नागरिक असली तरी तिचे कनेक्शन अनेक देशांशी राहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे, इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी आणि हिंदी या भाषा तिला अवगत आहेत.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अॅक्शन थ्रिलर चित्रपट श्रद्धा आणि प्रभासच्या 'साहो'मध्ये जॅकची एंट्री झाली आहे. या चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे . प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे.

Web Title: Jacqueline fernandez gets snapped hiding her face with cloth video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.