Jacqueline fernandez gets kick 2 as birthday gift will reunite with salman khan in film | Confirmed: जॅकलिन फर्नांडिसला मिळले बर्थ डेचे गिफ्ट, सलमान खानसोबत दिसणार 'किक2'मध्ये

Confirmed: जॅकलिन फर्नांडिसला मिळले बर्थ डेचे गिफ्ट, सलमान खानसोबत दिसणार 'किक2'मध्ये

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसच्या किकचा सिक्वेलची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी 'किक 2' ची घोषणा केली आहे. साजिद यांनी चित्रपटाची घोषणा जॅकलिनच्या बर्थ डेच्या दिवशी करत तिला गिफ्ट दिले आहे.

साजिद यांनी ट्विट करत लिहिले, हे आहे तुझं बर्थ डे गिफ्ट, जे तुझ्या कायम लक्षात राहिल. सकाळी 4 वाजता साजिद नाडियाडवाला यांनी 'किक 2'ची स्क्रिप्ट फायनल केली आणि त्यात तुझ्यासाठी एक सुंदर भूमिका लिहिले गेली आहे.  सलमान खानच्या 'किक 2' सुरूवात लवकरच होणार आहे. वेलकम बॅक. 

यावर जॅकलिन लिहिते, मी किक 2 ची प्रतीक्षा करू शकत नाही.  उर्वरित स्टारकास्टची घोषणा अजून झालेली नाही. रिपोर्टनुसार लॉकडाऊननंतर 'सलमान राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. किक 2014 ला रिलीज झाला होता.या चित्रपटाच्या माध्यमातून साजिदने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. या चित्रपटात सलमान आणि जॅकलिनच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jacqueline fernandez gets kick 2 as birthday gift will reunite with salman khan in film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.