'रामसेतू'मध्ये दिसणार जॅकलिन फर्नांडिस, अक्षय कुमारसोबत सातव्यांदा करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:43 PM2021-02-12T15:43:11+5:302021-02-12T15:43:43+5:30

‘राम सेतु’ चित्रपटामुळे अक्षय कुमार सध्या चर्चेत असून आता या चित्रपटात जॅकलिनही दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Jacqueline Fernandes, who will be seen in 'Ramsetu', will be working with Akshay Kumar for the seventh time | 'रामसेतू'मध्ये दिसणार जॅकलिन फर्नांडिस, अक्षय कुमारसोबत सातव्यांदा करणार काम

'रामसेतू'मध्ये दिसणार जॅकलिन फर्नांडिस, अक्षय कुमारसोबत सातव्यांदा करणार काम

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लॉकडाउन संपताच आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमारने सर्वात आधी आगामी चित्रपट बेल बॉटमचे शूटिंग संपवले आहे. आता सध्या तो बच्चन पांडेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करतो आहे. बच्चन पांडेनंतर तो रामसेतू चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अक्षय कुमारने चाहत्यांना सांगितले होते की रामसेतू चित्रपट पुढील दिवाळीला रिलीज होणार आहे. आता या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसही दिसणार असल्याचे समजते आहे. 

अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस. ‘हाउसफुल’, ‘हाउसफुल २’, ‘हाउसफुल ३’, ‘ब्रदर्स’सह अनेक चित्रपटांतून त्यांनी एकत्र काम केले आहे. आता ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात ती दिसणार असून ‘राम सेतु’ चित्रपटातही अक्षय कुमारसोबत ती दिसणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास तो त्यांचा एकत्र सातवा चित्रपट असेल.


अक्षय कुमारसोबत ती ‘बच्चन पांडे’मध्ये दिसणार असून आता मिळालेल्या माहितीनुसार ‘राम सेतु’ चित्रपटातही अक्षय कुमारसोबत तिला घेण्यात आले आहे. ‘राम सेतु’ चित्रपटामुळे अक्षय कुमार सध्या चर्चेत असून आता या चित्रपटात जॅकलिनही दिसणार अशी चर्चा असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

अर्थात अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जॅकलिनची या चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ‘राम सेतु’च्या निमित्ताने अक्षय कुमार-जॅकलिन फर्नांडिस ही जोडी सातव्यांदा एकत्र दिसणार असून त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Jacqueline Fernandes, who will be seen in 'Ramsetu', will be working with Akshay Kumar for the seventh time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.