Jacqueline Fernandes disclosed her relationship; 'To' do the date! | जॅकलिन फर्नांडिसने केला तिच्या रिलेशनशिपचा खुलासा; ‘यांना’ करतेय डेट!
जॅकलिन फर्नांडिसने केला तिच्या रिलेशनशिपचा खुलासा; ‘यांना’ करतेय डेट!

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. आता चाहत्यांमध्ये जॅकलिनच्या नात्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. तिने तिच्या फॅन्सना याबाबत एका मुलाखतीद्वारे सांगितले आहे.  

 एका मुलाखतीत जॅकलिन फर्नांडिसला ती सिंगल आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जॅकलिनने हास्यस्पद उत्तर दिले आहे. ‘मी माझ्या मांजरीला डेट करते. माझ्याकडे चार मांजर आहेत. तिचा पती आणि त्यांची दोन मुले देखील आहेत. आता हेच माझे कुटुंब आहे’, असे उत्तर तिने दिले आहे. जॅकलिनच्या या उत्तरावरुन एकंदरीत ती सिंगल असल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

जॅकलिनचे तिच्या मांजरींवर प्रचंड प्रेम आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मांजरींसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. दरम्यान हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरले झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी जॅकलिनचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये जॅकलिन प्रसिद्ध डिझायनर मिकी कॉन्ट्रॅक्टरसह मस्ती करताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये जॅकलिनच्या शोमधील लोकप्रिय पात्र बच्चा यादवचा एक जोक सांगत आहे. सध्या जॅकलिना ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेक आणि ‘किक २’ या चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.


Web Title: Jacqueline Fernandes disclosed her relationship; 'To' do the date!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.