ठळक मुद्देभूमी सध्या ‘सांड की आंख’ या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय कार्तिक आर्यन व अनन्या पांडेच्या ‘पती, पत्नी और वो’ या रिमेकमध्येही ती झळकणार आहे.

बी-टाऊनमधील ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या नव्या नाहीत. 2018 या वर्षांत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. तर 2019 या वर्षांत बॉलिवूडमध्ये लिंकअपच्या बातम्या चर्चेत राहिल्या. सारा अली खान-कार्तिक आर्यन ते रिया चक्रवर्ती-सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लिंकअपच्या चर्चा सध्या जोरात आहेत. आता आणखी एका सेलिब्रिटीच्या लिंकअपची चर्चा सुरु झाली आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्याबद्दल. भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी.

फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतेय.

अद्याप भूमी व जॅकीने आपले नाते जगजाहिर केलेले नाही. पण दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे लपून राहिलेले नाही. तूर्तास दोघांनीही आपल्या लिंकअपच्या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण येत्या दिवसांत दोघेही यावर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

जॅकी हा निर्माता वासू भगनानीचा मुलगा आहे. जॅकी भगनानीने 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. 2011 मध्ये  F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर ‘अजब गजब लव्ह’, ‘रंगरेज’, ‘मित्रों’ अशा अनेक चित्रपटात तो दिसला. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या तो पित्याचा निर्मिती व्यवसाय सांभाळतो.

भूमी सध्या ‘सांड की आंख’ या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय कार्तिक आर्यन व अनन्या पांडेच्या ‘पती, पत्नी और वो’ या रिमेकमध्येही ती झळकणार आहे.

Web Title: Jacky Bhagnani and Bhumi Pednekar dating each other?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.