Jackie Shroff's daughter Krishna spotted having fun with boyfriend, see these photos of her | जॅकी श्रॉफची लेक कृष्णा दिसली बॉयफ्रेंडसोबत धमालमस्ती करताना, पहा तिचे हे फोटो

जॅकी श्रॉफची लेक कृष्णा दिसली बॉयफ्रेंडसोबत धमालमस्ती करताना, पहा तिचे हे फोटो

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती तिचा बॉयफ्रेंड एबन हायम्ससोबत धमालमस्ती करते आहे. कृष्णा श्रॉफने एबम हायम्ससोबत केलेल्या फोटोंतून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कृष्णा श्रॉफने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एबन हायम्ससोबत बीचवर एन्जॉय करताना दिसते आहे. या फोटोतील त्यांची पोझ पाहून सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या आहेत. या फोटोतून अंदाज लावू शकतो की ते दोघे आकंठ प्रेमात बुडाला आहे.


कृष्णा श्रॉफ लॉकडाउनच्या सुरूवातीला एबन हायम्ससोबत मुंबईतून ऑस्ट्रेलियाला गेली होती. ती एबन हायम्ससोबत असलेल्या रिलेशनशीपबद्दल बेधडकपणे बोलत असते. कृष्णा श्रॉफ आणि एबन हायम्स पहिल्यांदा मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. यादरम्यान ते दोघांमध्ये बातचीत सुरू झाली आणि ते भेटू लागले. एबन हायम्स ऑस्ट्रेलियन बास्केटबॉल प्लेअर आहे.


कृष्णा श्रॉफचा भाऊ म्हणजेच टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत चांगले बॉण्डिंग आहे. कित्येक वेळा तिघे एकत्र स्पॉट झाले आहेत. याशिवाय ते तिघे एकमेकांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर कमेंट्स करत असतात. ज्यामुळे ते चर्चेतदेखील येतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jackie Shroff's daughter Krishna spotted having fun with boyfriend, see these photos of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.