टायगर श्रॉफच्या लूक्सची तुलना करिनासह करणाऱ्यांवर भडकले जॅकी श्रॉफ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:22 PM2021-09-18T12:22:21+5:302021-09-18T12:22:31+5:30

टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो.

Jackie Shroff slams trolls who compare Tiger Shroff's looks with Kareena Kappor | टायगर श्रॉफच्या लूक्सची तुलना करिनासह करणाऱ्यांवर भडकले जॅकी श्रॉफ

टायगर श्रॉफच्या लूक्सची तुलना करिनासह करणाऱ्यांवर भडकले जॅकी श्रॉफ

googlenewsNext

बॉलीवुडचा अॅक्शन हिरो म्हणून अभिनेता टायगर श्रॉफने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. फॅन्स टायगरच्या डान्सिंगवर फिदा आहेत. डान्स करताना टायगरमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. यांत टायगर डान्समध्ये तो चांगल्या चांगल्या डान्सर्सना कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळतं.

टायगर सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. स्वतःचे डान्स व्हिडीओ तो सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करतो. पण सुरुवातीला टायगरचा लूक वेगळाच होता. त्याचे लूक्स पाहून चाहते त्याची खिल्ली उडवायचे. करिना कपूरसह त्यांच्या लुक्सची तुलना केली जायची. मात्र टायगरनेही त्याच्या लुक्सवर प्रचंड मेहनत करत पिळदार बॉडी बनवली. आज त्याच्या लुक्सवरच जास्त तरुणी फिदा असतात.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनीच टायगरच्या लुक्सवर ट्रोल करणा-यांना चांगले सुनावले आहे. मला माहिती आहे की, रुपेरी पडद्यावर हिरो कसा असावा तसा तो दिसत नाही. पण तो यावरही मेहनत करत आहे.

 

अनेकदा करिनासह त्याची तुलना करत त्याची खिल्ली उडवली जाते. सोशल मीडियावर यावर कॉमेडी मिम्स व्हायरल केले जातात. पण या गोष्टीचा टायगरला अजिबात फरक पडत नाही. त्याला काय करायचे आहे हे उत्तमरित्या तो जाणतो. त्यामुळे कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है केहना असेच मी म्हणेन.

टायगरप्रमाणे त्याची बहिण कृष्णा श्रॉफलाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येते. तिचे बोल्ड फोटोंमुळे ती नेटीझन्सच्या निशाण्यावर असते. जेव्हा भघावं तेव्हा तिचे फोटो व्हायरल होत असतात. नेटीझन्सही तिला बोल्ड फोटोंमुळे ट्रोल करत तिची खिल्ली उडवताना दिसतात.

 

कृष्णालाही या टोलिंगचा अजिबात फरक पडत नाही. बिनधास्त आणि बोल्ड लूक्स शेअर करत ती सोशल मीडियावर सर्वांच्या नजरा वेधून घेत असते. टायगर आणि कृष्णा दोघांनाही सोशल मीडियावर चांगलेच फॅनफॉलोइंग आहे.दोघांचाही सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. 

Web Title: Jackie Shroff slams trolls who compare Tiger Shroff's looks with Kareena Kappor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.