गर्लफ्रेन्डला विसरून बसमधील ‘त्या’ १३ वर्षांच्या मुलीवर भाळला जॅकी श्रॉफ, वाचा इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:09 PM2020-04-27T13:09:12+5:302020-04-27T13:10:06+5:30

गर्लफ्रेंडलाही दिलं सोडून...

jackie shroff and his wife ayesha love story-ram | गर्लफ्रेन्डला विसरून बसमधील ‘त्या’ १३ वर्षांच्या मुलीवर भाळला जॅकी श्रॉफ, वाचा इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

गर्लफ्रेन्डला विसरून बसमधील ‘त्या’ १३ वर्षांच्या मुलीवर भाळला जॅकी श्रॉफ, वाचा इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ५ जून १९८७ रोजी जॅकी व आयशा विवाहबंधनात अडकले.

 बॉलिवूडमध्ये ‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणारा  जॅकी श्रॉफ एक हरहुन्नरी अभिनेता. बिनधास्त, मुंबैय्या जग्गू आजपर्यंत आपल्या अटींवर जगत आलाय. जग्गू दादाच्या सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावले. जॅकीची प्रोफेशनल लाईफ जितकी मजेशीर राहिली, तितकीच त्याची लव्ह लाईफही मजेशीर राहिली. जॅकीची लव्ह स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. 

होय, जॅकी एका 13 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले आणि याच मुलीसोबत जॅकी लग्नबंधनात अडकले. ही मुलगी कोण तर आयशा दत्त. होय, एकदिवस जॅकी रेकॉर्डिंगसाठी जात होते. बसस्टॉपवर बसची वाट पाहत असताना अचानक त्यांची नजर बसच्या खिडकीतील मुलीवर खिळली. तिला पाहताच जॅकी तिच्यावर अक्षरश: फिदा झालेत. त्यांनी नेमकी तीच बस पकडली आणि त्या मुलीजवळ गेले. तिच्यासोबत गप्पा सुरू झाल्या. ही आयशासोबतची पहिली भेट. यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघांत चांगली मैत्री झाली.

जॅकी आधीच 13 वर्षांच्या आयशाच्या प्रेमात पडले होते. आयशालाही ते कळत होते. पण हे प्रेम पुढे न्यायचे म्हटले तर एक समस्या होती. होय, कारण जॅकी आधीच रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांची ती गर्लफ्रेन्ड शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. एकीकडे आयशाला सोडवत नव्हते आणि दुसरीकडे आधीच असलेल्या गर्लफ्रेन्डला सांगवत नव्हते. पण त्यांनी एक मात्र केले, आयशाला हे सगळे त्यांनी सांगितले होते.
 मग काय, आयशानेच पुढाकार घेतला आणि जॅकीच्या त्या गर्लफ्रेन्डला एक पत्र लिहिले. या पत्राने आयशा व जॅकीचा मार्ग मोकळा झाला.


 
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ५ जून १९८७ रोजी जॅकी व आयशा विवाहबंधनात अडकले. आयशा लग्नानंतर चित्रपट निर्माती बनली.  
जॅकीला दोन मुले आहेत. एक बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णा.


  

Web Title: jackie shroff and his wife ayesha love story-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.