13 वर्षांनंतर रिलीज होणार हा सिनेमा; हिरोईन बनली दोन मुलांची आई अन् हिरो अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतून ‘गायब’

By रूपाली मुधोळकर | Published: November 6, 2020 10:22 AM2020-11-06T10:22:59+5:302020-11-06T10:24:09+5:30

होय,  2007 मध्ये या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. मात्र आत्ताकुठे या सिनेमाला रिलीज डेट मिळाली.

its my life releasing on after long wait of 13 years starring genelia dsouza nana patekar and harman baweja | 13 वर्षांनंतर रिलीज होणार हा सिनेमा; हिरोईन बनली दोन मुलांची आई अन् हिरो अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतून ‘गायब’

13 वर्षांनंतर रिलीज होणार हा सिनेमा; हिरोईन बनली दोन मुलांची आई अन् हिरो अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतून ‘गायब’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इट्स माय लाइफ’ हा सिनेमा अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. ‘बोम्मारिल्लू’ या तेलगू सिनेमाचा हा रिमेक आहे.

शूटींग पूर्ण झाल्यावर एखादा चित्रपट रिलीज व्हायला किती वेळ लागू शकतो?  2 वर्षे, 3 वर्षे किंवा अधिकाधिक 5 वर्षे. मात्र एक सिनेमा असा आहे, ज्याचे शूटींग पूर्ण होऊनही तो रिलीज व्हायला 13 वर्षे लागली. होय, तब्बल 13 वर्षानंतर या सिनेमाला रिलीज डेट मिळालीय. या सिनेमाचे नाव आहे, ‘इट्स माय लाइफ’.
 2007 मध्ये या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. मात्र आत्ताकुठे या सिनेमाला रिलीज डेट मिळाली. येत्या  29 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. या 13 वर्षांच्या काळात या सिनेमातील मुख्य कलाकारांचे अख्खे आयुष्य बदलले आहे.

चित्रपटाचा लीड अ‍ॅक्टर कोण तर हरमन बावेजा. हा हरमन बावेजा आत्ता कुठे आहे तर इंडस्ट्रीतून संन्यास घेऊन बाहेर पडला आहे.  लीड अ‍ॅक्टेस कोण तर जेनेलिया डिसूजा. ती म्हणायला इंडस्ट्रीत अजूनही अ‍ॅक्टिव्ह आहे. मात्र दोन मुलांची आई झाली आहे.

सिनेमात हरमन बावेजाच्या वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेता नाना पाटेकर सध्या फिल्मी दुनियेपासून थोडा दूर, शांत एकांतवासात जगतो आहे.
‘इट्स माय लाइफ’ हा सिनेमा अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. ‘बोम्मारिल्लू’ या तेलगू सिनेमाचा हा रिमेक आहे. थेट झी सिनेमा या टीव्ही चॅनेलवर 29 नोव्हेंबर 2020 रोजी याचा प्रीमिअर होतोय. सिनेमात हरमन, जेनेलिया, नाना पाटेकर यांच्याशिवाय कॉमेडियन कपिल शर्मा याचीही भूमिका आहे.

सध्या कुठे आहे हरमन?

2009 मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी2050’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण  लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू  ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकल्या गेला. 
 एकेकाळी सिक्स पॅक अ‍ॅब्सचा बादशाह असलेला हरमन आज पुरता बदलला आहे. ना ते कसलेले शरीर, ना सिक्स अ‍ॅब्स. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही बातमीसोबत दिलेले हे फोटो पाहायलाच हवेत. पांढरे केस, वाढलेले वजन अशा रूपात हरमनला पाहणे तुमच्यासाठी आश्चयार्चा धक्का असेल. हरमन आता चित्रपट करत नाही. 

जेनेलियाचे काय?

सिनेमाची लीड हिरोईन जेनेलिया डिसूजाने 2012 साली अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्नगाठ बांधली. आता ती दोन मुलांची आई आहे. मुलांच्या जन्मानंतर जेनेलिया त्यांच्या संगोपणात रमली. याकाळात तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. आत्ता पुन्हा ती कमबॅक करू इच्छिते.

Web Title: its my life releasing on after long wait of 13 years starring genelia dsouza nana patekar and harman baweja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.