ठळक मुद्देईशा कोप्पीकर दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या महेश मांजरेकर यांच्या मराठी सिनेमामध्ये दिसली होती.

गतवर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाला वाचा फोडली होती. यानंतर अनेक अभिनेत्रींनी आपली आपबीती ऐकवली. आता आणखी एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, एकेकाळी आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना ‘खल्लास’ करणा-या एका मराठी अभिनेत्रीला बॉलीवूड मध्ये काम मिळवण्यासाठी कास्टिंग काऊच सारख्या गलिच्छ प्रकाराला सामोरे जावे लागले होते.  या अभिनेत्रीचे नाव आहे  ईशा कोप्पीकर.

राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून ईशाने आपल्या करियरला सुरवात केली होती. यानंतर तिने एकापाठोपाठ अशा अनेक चित्रपटांत काम केले. गेल्या काही वर्षांपासून ईशा चित्रपटांपासून दूर आहे. पण आता तिने एका बड्या सुपरस्टारवर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. 

पिंकविला या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ईशाने आपबीती सांगितली. कास्टिंग काऊचबद्दल विचारल्यावर, हो, मलाही यातून जावे लागले, असे ती म्हणाली. तिने सांगितले की,  एकदा एका निर्मात्याने मला एका सिनेमाबद्दल सांगितले. तू एकदा या अभिनेत्याला  कॉल कर, असेही तो म्हणाला. निर्मात्याने सांगितल्यानुसार, मी त्या अभिनेत्याला कॉल केला. तेव्हा त्या अभिनेत्याने मला त्याची संपूर्ण दिनचर्या सांगितली. मी लवकर उठतो आणि जिमला जातो, वगैरे वगैरे तो बोलला. यानंतर त्याने मला त्याच्या आगामी सिनेमाच्या डबिंग आणि कुठल्यातरी दुस-या कामाच्या दरम्यान भेटायला बोलवले. पाठोपाठ तू कोणासोबत येणार आहेस? असा प्रश्नही   केला. मी ड्राइवर सोबत येत आहे म्हटल्यावर एकटीच ये असे तो मला म्हणाला. त्याचा हेतू मला लगेच लक्षात आला. मी समजायचे ते समजले आणि त्याला थेट नकार दिला. या घटनेनंतर मी त्या निर्मात्याला फोन केला. मला माझ्या टॅलेंटच्या जोरावर चित्रपट मिळायला हवा, असे मी त्याला म्हणाले. साहजिकच त्यानंतर तो सिनेमा माझ्या हातून गेला. 


 घराणेशाही बद्दल विचारले असता ईशा म्हणाली,‘ब-याचदा मला सिनेमामध्ये एखादी भूमिका मिळालेली असे. पण एखादा फोन येई आणि मग कोणाच्या तरी मुलीला ती भूमिका दिली जाई किंवा एखाद्याच्या गर्लफ्रेंडला किंवा पत्नीकडे ती सोपवली जाई. 
ईशा कोप्पीकर दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या महेश मांजरेकर यांच्या मराठी सिनेमामध्ये दिसली होती. सध्या ती राजकारणातही सक्रिय आहे. ती भारतीय जनता पाटीर्ची सदस्य आहे.

Web Title: isha koppikar opens up about casting couch experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.