ठळक मुद्देइंद्र कुमार आणि तिची ओळख 1998 मध्ये झाली होती. त्यांचे अफेअर 2002 पर्यंत होते. ईशा इंद्र कुमारच्या कुटुंबियांच्या देखील खूप जवळची होती. पण इंद्र कुमारच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यात सतत खटके उडायला लागले आणि त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला.

ईशा कोप्पीकरचा आज वाढदिवस असून तिचा जन्म 19 सप्टेंबर 1976 ला मुंबईत झाला. तिचे शिक्षण रुईया कॉलेजमध्ये झाले असून तिने एक मॉडेल म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. ती तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती. मॉडलिंग करत असताना तिला चंद्रलेखा या दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून तिचा अभिनयप्रवास सुरू झाला. 

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर ईशा बॉलिवूडकडे वळली. तिने फिजा या चित्रपटातील एका आयटम साँगद्वारे बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कंपनी या चित्रपटातील खल्लास या गाण्यामुळे तिला खल्लास गर्ल अशी ओळख मिळवून दिली. तिने पिंजर, दिल का रिश्ता, क्या कूल है हम, डॉन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

ईशाचे लग्न टीमी नारंगसोबत झाले असून तो एक व्यवसायिक आहे. त्यांना रायना ही मुलगी असून तिचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला. टीमीसोबत लग्न व्हायच्याआधी ईशा एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. हा अभिनेता इंद्र कुमार असून ईशा आणि इंद्र कुमारचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. ते दोघे लग्न करणार असे देखील म्हटले जात होते. इंद्र कुमार आणि तिची ओळख 1998 मध्ये झाली होती. त्यांचे अफेअर 2002 पर्यंत होते. ईशा इंद्र कुमारच्या कुटुंबियांच्या देखील खूप जवळची होती. पण इंद्र कुमारच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यात सतत खटके उडायला लागले आणि त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. इंद्र कुमारने त्यानंतर सोनल करियासोबत लग्न केले. पण लग्नानंतर देखील इंद्र ईशाला विसरू शकला नव्हता असे सोनलने एका मुलाखतीत सांगितले होते. गेल्या वर्षी इंद्र कुमारचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

ईशा कोप्पीकर सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरीदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती काम करते आहे. नुकतेच तिने भारतीय जनात पक्षात प्रवेश करून राजकरणात प्रवेश केला. तसेच ती लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. फिक्सर असे या वेबसीरिजचे नाव असून यात ईशा पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे.


Web Title: Isha Koppikar Birthday Special: Isha koppikar had affair with indra kumar before marrying to timmy narang
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.