इरफान खानसारखाच आहे त्यांचा मुलगा बाबिल, बघा फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय लिहिलं

By अमित इंगोले | Published: September 23, 2020 04:18 PM2020-09-23T16:18:00+5:302020-09-23T16:19:05+5:30

सध्या तो त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आहे. ज्यातून स्पष्टपणे दिसून येतं इरफान खान यांचा मुलगा त्यांच्याच पावलावर पाउल देऊन चालणारा आहे.

Irrfan Khan son babil opts for no religion in the religious beliefs column on his college form | इरफान खानसारखाच आहे त्यांचा मुलगा बाबिल, बघा फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय लिहिलं

इरफान खानसारखाच आहे त्यांचा मुलगा बाबिल, बघा फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय लिहिलं

googlenewsNext

लोकप्रिय अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बाबिल सतत सोशल मीडियावर त्यांच्या आठवणीत काहीना काही शेअर करत असतो.  सध्या तो त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आहे. ज्यातून स्पष्टपणे दिसून येतं इरफान खान यांचा मुलगा त्यांच्याच पावलावर पाउल देऊन चालणारा आहे.

बाबिलने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सिद्ध केलं आहे की, तो त्याच्या वडिलांना कशाप्रकारे फॉलो करतो. इरफान खान हा कधीच त्याचं सरनेम लावत नव्हते आणि कधीही ते त्यांचं नाव केवळ इरफान असंच लिहिणं पसंत करत होते. इतकेच काय तर ते सोशल मीडियावरही केवळ इरफान असंच लिहित होते. आता असं वाटतंय की, बाबिलही असंच काहीसं करण्याच्या प्रयत्नात आहे.

नुकतीच बाबिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात त्याच्या लॅपटॉपची स्क्रीन दिसत आहे. या फोटोत त्याने एक फॉर्म भरलाय. ज्यात बाबिलने धर्माच्या कॉलममध्ये में Religious Belief कॉलममध्ये 'नो रिलीजन' असा पर्याय निवडलाय.

इरफान यांनी त्यांच्या नावातून 'खान' हे सरनेम हटवलं होतं. याबाबत त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी इरफान आहे केवळ इरफान. मी काही दिवसांपासून आपल्या नावासोबत सरनेम लावणं बंद केलं. कारण मला माझा धर्म, माझ्या सरनेम किंवा अशा कोणत्याच गोष्टींने मला ओळखलं जाऊ नये. मला माझ्या पूर्वजांच्या कामाने आपली ओळख बनवायची नाहीये'. इरफान खान यांचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं आहे.

Web Title: Irrfan Khan son babil opts for no religion in the religious beliefs column on his college form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.