कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 02:22 PM2022-04-14T14:22:53+5:302022-04-14T14:23:42+5:30

शाहिद कपूर (Shahid Kapoor), वडील पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)सोबत 'जर्सी'(Jersey)च्या प्रमोशनसाठी अलीकडेच 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)च्या सेटवर पोहोचला होता.

In Kapil Sharma's show, Shahid Kapoor's father opened secrets of him, Son talk stopped | कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर(Shahid Kapoor)चा आगामी जर्सी (Jersey) या चित्रपटाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहे. आधी हा चित्रपट १३ एप्रिल रोजी रिलीज होणार होता, परंतु नंतर 'केजीएफ चॅप्टर २' (KGF 2) आणि बीस्ट(Beast)च्या रिलीजमुळे निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. सध्या शाहिद कपूर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच शाहिद कपूर वडील पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)सोबत 'जर्सी'च्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)च्या सेटवर पोहोचला होता.

सोनी वाहिनीने कपिल शर्मा शोच्या एपिसोडचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहिद आणि पंकज कपूर पहिल्यांदाच शोमध्ये एकत्र दिसत आहेत. यादरम्यान कपिलनेही शाहिदला चिडवण्याची संधी मिळू दिली नाही. प्रोमोची सुरुवात शाहिद आणि मृणाल स्टेजवर येण्यापासून होते. शाहिदने पांढरा शर्ट, पिवळे जॅकेट आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केली आहे, तर मृणालने काळी साडी परिधान केली आहे.

यादरम्यान कपिलने मृणालला विचारले की, ती शाहिदला चित्रपटात क्रिकेट खेळण्यापासून का थांबवते आहे. कपिल विचारतो- 'तुमच्याकडे धोनीची जर्सी आहे का?' त्यानंतर सगळे हसायला लागतात. तेव्हा मृणाल म्हणाली की, या चित्रपटात ती घरच्या कामांसोबतच कमावतेय, मग त्याच्याशी भांडण का करू नये. याला उत्तर देताना शाहिद म्हणाला- मी चित्रपटात काहीतरी करेन... काही होणार नाही असे समजू नका... मी इतका नालायक नाही.


या शोमध्ये अभिनेत्याशिवाय त्याचे वडील पंकज कपूर देखील दिसले होते, मात्र शाहिदला याची माहिती नव्हती. कपिल शर्माने पंकज कपूरला स्टेजवर बोलावताच शाहिद कपूर बोलायचे थांबला. शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर हे जर्सीमध्ये त्यांचे प्रशिक्षक आहेत. कपिलने शाहिदला विचारले की तू कधी लेक्चरला दांडी मारून फिरायला गेला होतास का या प्रश्नावर वडील पंकज यांच्यासमोर शाहिद गोंधळून गेला. सध्या शोचा प्रोमो व्हायरल होत असून शाहिदचे पोलखोल करणारा हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: In Kapil Sharma's show, Shahid Kapoor's father opened secrets of him, Son talk stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.