बऱ्याच वर्षांनंतर दिसला बॉलिवूडचा हा अभिनेता, चाहते झाले खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:30 PM2019-11-26T19:30:21+5:302019-11-26T19:30:44+5:30

बॉलिवूडचा हा अभिनेता गेल्या ४ वर्षांपासून आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब

Imran Khan 'Lost and Found', Say Fans After Seeing the Actor's Pic | बऱ्याच वर्षांनंतर दिसला बॉलिवूडचा हा अभिनेता, चाहते झाले खूश

बऱ्याच वर्षांनंतर दिसला बॉलिवूडचा हा अभिनेता, चाहते झाले खूश

googlenewsNext

आमीर खानचा भाचा इमरान खानने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर प्रेक्षकांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र २०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला व तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. त्यानंतर तो मीडियापासून लांब राहू लागला. मात्र आता नुकताच तो बऱ्याच वर्षानंतर दिसला.


अभिनेत्री दीया मिर्झा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत डायना पेंटी, अदिति राव हैदरी, निमरत कौर, निखिल आडवाणी व इमरान खान पहायला मिळतो आहे. मात्र या फोटोत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते इमराननं. तो फारच बारीक दिसतो आहे आणि तसेच त्याने बारीक केसांची हेअरस्टाईल केली आहे. त्याचा हा लूक पाहून सगळे हैराण झाले आहेत. तिच्या या फोटोंवर लोकांनी त्याला प्लीझ कमबॅक अशी कमेंट केली आहे. 


इमरान खानला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला आहे. डेल्ही बेली, मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते. शेवटचा तो २०१५ साली कट्टी बट्टी चित्रपटात झळकला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कंगना रानौत मुख्य भूमिकेत होती.

गेल्या चार वर्षांपासून इमरान घरी बसलेला आहे. अभिनयात अपयश मिळाल्यानंतर इमरानने दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथे ही त्याच्या पदरी अपयशचं आले. त्यानंतर तो सिनेमा व इव्हेंट्समध्येही दिसला नाही. त्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता ज्यावेळी त्याच्यात व त्याची पत्नी अवंतिका यांच्यात वाद सुरू झाले होते आणि ते घटस्फोट घेणार होते.

इमरान आणि अवंतिकाने आपलं नातं पूर्वीसारखे होण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी झाले. दोघांनी मिळून हा विचार केला की आपल्या नात्याला थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि अवंतिका मुलीला घेऊन आईच्या घरी आली. दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही मात्र मे महिन्यापासून अवंतिका आपल्या माहेरीच राहते आहे.

Web Title: Imran Khan 'Lost and Found', Say Fans After Seeing the Actor's Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.