बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 04:27 PM2021-04-23T16:27:57+5:302021-04-23T17:01:24+5:30

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकरच ती 'अनफेयर अँड लवली' सिनेमात दिसणार आहे.

Ileana d cruz underwater photos on social media goes viral | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

googlenewsNext

'रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना सध्या व्हॅकेेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे. इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चित्रपटांसोबत ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठीही ओळखली जाते. इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिचे काही बीचवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अंडरवाटर मस्ती करताना दिसतेय. इलियानने शेअर केलेला हा अल्बम तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सोशल मी़डियावर तिचे हे फोटो व्हायरल होतायते. तिचे हे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.


ही पहिली वेळ नाही याआधीही अशाप्रकारे ग्लॅमरस फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. कमीत कमी मेकअप, विस्कटलेले केस आणि तितकाच ग्लॅमरस अंदाजातील इलियाने फोटो लक्षवेधी ठरतात.तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर इलियाना 'अनफेयर अँड लवली' सिनेमाचे दिसणार आहे. या सिनमात इलियानासह रणदीप हुडाही झळकणार आहे. बलविंदर सिंह जंजुआ यांनी सिनेमाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. सिनेमात इलियाना लव्हली नावाच्या मुलीची भूमिका साकारणार असून रणदीर हुडा पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Ileana d cruz underwater photos on social media goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.