Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:56 AM2019-10-22T10:56:57+5:302019-10-22T10:58:28+5:30

होय, या सोहळ्यात असे काही झाले की, आलिया भटचा चेहरा लाजून लाजून लाल झाला.

iifa awards 2019 rekha call ranbir kapoor alia bhatt lover here is actress reaction | Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया!

Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया!

googlenewsNext
ठळक मुद्दे रणबीर एक चांगला प्रियकरही आहे,’ असे त्या म्हणाल्या. रेखांनी आलियासमोर एकदा नाही तर तिनदा ही लाईन रिपीट केली.

नुकतेच टीव्हीवर आयफा अवार्ड 2019 चे प्रसारण झाले आणि  एक व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला. होय, या सोहळ्यात असे काही झाले की, आलिया भटचा चेहरा लाजून लाजून लाल झाला. त्याचे झाले असे की, या सोहळ्यात गत 20 वर्षांतील बेस्ट मेल अ‍ॅक्टरच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ‘बर्फी’ या चित्रपटासाठी रणबीर कपूरला हा पुरस्कर देण्यात आला.
 बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा हा पुरस्कार देण्यासाठी मंचावर आल्यात. पण पुरस्काराची घोषणा करण्यापूर्वी रेखा यांनी रणबीरची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

तो खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला सहकलाकार आहे, खूप चांगला भाऊ आणि तेवढाच चांगला अभिनेता आहे, असे म्हणत रेखांनी रणबीर कपूरच्या नावाचा पुकारा केला. पण रणबीर कपूर सोहळ्यात हजर नव्हता. त्याच्या नावाचा पुरस्कार घेण्यासाठी दिग्दर्शक अनुराग बासू मंचावर आले आणि त्यांनी रणबीरच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. पण गोष्ट इथेच संपली नाही.

नेमक्या याच क्षणी  आयफा अवार्ड 2019 चा होस्ट आयुष्यमान खुराणाने आलियाला मंचावर येण्याची विनंती केली. आलियाने मंचावर येऊन ‘गली बॉय’चा ‘मेरे बॉयफ्रेन्ड से गुलगुलु करेगी...’हा लोकप्रिय डायलॉग म्हणून दाखवावा, असे तो म्हणाला. त्यानुसार आलिया भट मंचावर आली. ती मंचावर येताच रेखा पुन्हा बोलू लागल्या. ‘आलिया डायलॉग म्हणण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगू इच्छिते. जे मी सांगायचे विसरले होते. रणबीर एक चांगला प्रियकरही आहे,’ असे त्या म्हणाल्या. रेखांनी आलियासमोर एकदा नाही तर तिनदा ही लाईन रिपीट केली. रेखाचे हे वाक्य ऐकून आलिया कमालीची लाजली. इतकी की, लाजून तिने आपला चेहरा रेखांच्या मागे लपवला.
 

Web Title: iifa awards 2019 rekha call ranbir kapoor alia bhatt lover here is actress reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.