आयफा अवॉर्ड्स २०१९चं यंदा मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या कलाकारांचा जबरदस्त जलवा पहायला मिळाला. दीपिका पादुकोण, सलमान खान, कैटरीना कैफ, आलिया भट्ट्, रेखा, आयुषमान खुराना ,विक्की कौशल, रणवीर सिंह, माधुरी दीक्षित यासारख्या अनेक कलाकारांचा स्वॅग पहायला मिळाला. या सेलिब्रेटींसोबत या ठिकाणच्या एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरील सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सलमान खानच्या मागून कुत्रा धावताना दिसतो आहे. 

खरेतर आयफा पुरस्कार सोहळ्यात सलमान खान दबंग अंदाजात पहायला मिळाला. प्रसारमाध्यमांना पोझ दिल्यानंतर सलमान खान तिथून निघाला. मात्र याचदरम्यान तिथे एक कुत्रा सलमान खानच्या मागे मागे जाताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओवर काही लोकांनी मजेशीर अंदाजात घेतलं तर काहींनी यावर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत टीका केली.

आयफामध्ये दीपिका पादुकोणला स्पेशल अवॉर्ड फॉर बेस्ट एक्ट्रेस, रणवीर सिंगला बेस्ट एक्टर, आलिया भट्टला बेस्ट एक्ट्रेस, श्रीराम राघवनला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो आगामी चित्रपट दबंग ३मध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या सेटवरील बरेच व्हिडिओ समोर आले आहेत. या चित्रपटातून महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

त्याशिवाय सोनाक्षी सिन्हा देखील दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे.

Web Title: IIFA Awards 2019: Oops! The dog ran behind Salman Khan, the video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.