ठळक मुद्देसई व सलमान एकत्र आयफा सोहळ्यात आले. साहजिकच सलमानची सोबत मिळाल्याने आयफा नाईटमध्ये सलमानची सईवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या.

बुधवारी रात्री मुंबईत आयफा अवार्डची रात्र चांगलीच रंगली. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान यानेही आयफा अवार्डच्या ग्रीन कार्पेटवर जबरदस्त एन्ट्री घेतली. पण एकटी नाही तर एका सुंदर तरूणीसोबत. सलमानसोबतची ही सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. तर ही सुंदर तरूणी होती, अभिनेते महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर.

सई व सलमान एकत्र आयफा सोहळ्यात आले. साहजिकच सलमानची सोबत मिळाल्याने आयफा नाईटमध्ये सलमानची सईवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. यावेळी सलमान ब्ल्यू सूट आणि ब्लॅक शर्टमध्ये होता तर सईने सुंदर लहंगा घातलेला होता.

सई व सलमानने एकत्र अनेक पोज दिल्यात. सलमान खान ‘दबंग 3’ या चित्रपटातून सईला लॉन्च करत आहे. सईचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. सई या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सलमान व सईशिवाय सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सईचे बाबा अर्थात महेश मांजरेकर हेही कॅमिओ रोलमध्ये या चित्रपटात दिसणार आहेत.


महेश मांजरेकर व सलमान यांच्यात चांगली मैत्री आहे. मुलीच्या डेब्यूकडे महेश मांजरेकर जातीने लक्ष देत आहेत. मुंबई मिररने दिलेले वृत्त खरे मानाल तर, महेश यांनी आपल्या मुलीसाठी ‘नो डेटींग क्लॉज’ जारी केला आहे. सईने केवळ आणि केवळ तिच्या अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्यावे, अशी महेश मांजरेकर यांची इच्छा आहे.


सलमानने याआधी अनेकांना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. आता सईचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच.

Web Title: iifa 2019 know the actress with whom salman khan makes grand entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.