... तर सैफसारखीच अमृता सिंगनेही दुसऱ्यांदा बांधली असती लगीनगाठ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:41 PM2021-11-26T13:41:17+5:302021-11-26T13:41:44+5:30

अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान लग्नाच्या १३ वर्षांनंतर वेगळे झाले होते.

If this had not been an obstacle, Amrita Singh would have been stuck in a marriage like Saif Ali Khan for the second time! | ... तर सैफसारखीच अमृता सिंगनेही दुसऱ्यांदा बांधली असती लगीनगाठ!

... तर सैफसारखीच अमृता सिंगनेही दुसऱ्यांदा बांधली असती लगीनगाठ!

googlenewsNext

एकेकाळी अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी होती. अमृता आणि सैफने १९९१ साली लग्न केले होते. त्यावेळी सैफ आणि अमृताच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. खरेतर त्यांच्या लग्नाच्या वेळी अमृता सिनेइंडस्ट्रीतील स्टारपैकी एक होती. तर त्यावेळी सैफ अली खानने करिअरची सुरूवात केली होती. तसेच त्यांच्या वयातदेखील खूप अंतर होते. लग्नाच्या वेळी सैफ अली खान फक्त २१ वर्षांचा होता, तर अमृता ३३ वर्षांची होती.

खरेतर सैफ आणि अमृताचे वैवाहिक जीवन काही वर्षे खूप आनंदी सुरू होते आणि त्यांना दोन मुलेदेखील झाली ज्यांचे नाव सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर सैफ आणि अमृताच्या नात्यात कटुता येऊ लागली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे लग्नाच्या १३ वर्षांनंतर ते दोघे विभक्त झाले.

२०१२ साली सैफने करीनासोबत केले लग्न
घटस्फोटानंतर काही वर्षानंतर २०१२ साली सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. मात्र अद्याप अमृता सिंगलच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अमृताने मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. याच कारणामुळे तिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तिने संपूर्ण लक्ष सारा आणि इब्राहिमकडे दिले. घटस्फोटानंतर सैफने साराला पोटगी म्हणून ५ कोटी रुपये दिले होते. इतकेच नाही तर इब्राहिमला १८ वर्षांचा होईपर्यंत दरमहिना १ लाख रुपये अमृताकडे दिले होते.

Web Title: If this had not been an obstacle, Amrita Singh would have been stuck in a marriage like Saif Ali Khan for the second time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.