icc world cup 2019 ranveer singh dances with and sunil gavaskar on badan pe sitaare song during india vs pakistan match | IND vs PAK मॅचदरम्यान रणवीर सिंगसोबत 'बदन पे सितारे'वर थिरकला हा क्रिकेटर, पहा हा व्हिडिओ
IND vs PAK मॅचदरम्यान रणवीर सिंगसोबत 'बदन पे सितारे'वर थिरकला हा क्रिकेटर, पहा हा व्हिडिओ

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मधील भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याने अख्ख्या क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर रंगलेल्या या सामन्याला अभिनेता रणवीर सिंगने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या क्रिकेट नॉलेजने सगळ्यांची मनं जिंकली. त्याचे फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळाले. 

या सामन्यादरम्यानचे मजेशीर व्हिडिओज, फोटो व मीम्स इंटरनेटवर पहायला मिळत आहेत. या दरम्यान रणवीर सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात 'बदन पे सितारे लपेटे हुए' गाण्यावर रणवीर थिरकताना दिसला आणि त्याच्यासोबत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनीदेखील या गाण्यावर ताल धरला. हा व्हिडिओ हरभजन सिंगने देखील सोशल मीडियावर शेअर केलाय.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. या सामन्यादरम्यान त्यानं काही काळ कॉमेंट्रीदेखील केली. मात्र आता त्याचा मँचेस्टरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो विराट कोहलीला गळाभेट करताना दिसतोय. 


रणवीर सिंगबद्दल सर्वांनाच चांगलं माहित आहे की तो जिथे कुठे जातो तिथे तो रंगत आणतो. नुकत्याच पार पडलेल्या या सामन्यात रणवीर रॉकिंग अंदाजात पहायला मिळाला. सामन्यादरम्यान व सामना संपल्यानंतर रणवीर जोशमध्ये पहायला मिळाला.

रणवीरचा मँचेस्टरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तो विराट कोहलीला गळाभेट करीत त्याचे अभिनंदन करताना दिसतोय.


Web Title: icc world cup 2019 ranveer singh dances with and sunil gavaskar on badan pe sitaare song during india vs pakistan match
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.