टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 01:07 PM2019-06-17T13:07:13+5:302019-06-17T13:13:52+5:30

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता.

icc world cup 2019 bollywood actor ranveer singh hugs virat kohli after india won match against pakistan | टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext


मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. या ऐतिहासिक विजयासाठी सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केले. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी काही सेलेब्स मँचेस्टरला गेले होते. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. या सामन्यादरम्यान त्यानं काही काळ कॉमेंट्रीदेखील केली. मात्र आता त्याचा मँचेस्टरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो विराट कोहलीला गळाभेट करताना दिसतोय.


रणवीर सिंगबद्दल सर्वांनाच चांगलं माहित आहे की तो जिथे कुठे जातो तिथे तो रंगत आणतो. नुकत्याच पार पडलेल्या या सामन्यात रणवीर रॉकिंग अंदाजात पहायला मिळाला. सामन्यादरम्यान व सामना संपल्यानंतर रणवीर जोशमध्ये पहायला मिळाला. रणवीरचा मँचेस्टरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तो विराट कोहलीला गळाभेट करीत त्याचे अभिनंदन करताना दिसतोय.




या व्हिडिओत रणवीर सिंग सूट बूट घालून सामना संपल्यावर स्टेडिअममध्ये जाऊन सगळ्यांसमोर विराट कोहलीला गळाभेट करताना दिसतोय आणि त्याने विराटला अभिनंदन केले. त्यानंतर ते दोघे काही चर्चा करताना पहायला मिळत आहेत.




या व्हिडिओ व्यतिरिक्त रणवीर सिंगचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत तो खूप जोशमध्ये दिसतो आहे. रणवीर कधी खेळांडूसोबत फोटो क्लिक करतोय तर कधी कॉमेंट्री करताना पहायला मिळतोय.




रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो वर्ल्डकपवर आधारीत चित्रपट ८३मध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात त्याची पत्नी व अभिनेत्री दीपिका पादुकोण त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: icc world cup 2019 bollywood actor ranveer singh hugs virat kohli after india won match against pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.