ठळक मुद्दे‘जवानी जानेमन’मधील या भूमिकेसाठी सुरूवातीला सैफची मुलगी सारा अली खानला विचारणा झाली होती. मात्र तिने वडीलांसोबत काम करण्यास नकार दिला आणि ही भूमिका आलिया फर्निचरवाला हिच्या झोळीत पडली.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याने अख्ख्या क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर रंगलेल्या या लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी  टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. रणवीर सिंगने नेहमीप्रमाणे  माहौल  केला तर सैफ एका सुंदर तरूणीसोबत शांतपणे टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसला. पण याचवेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर, ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी.


  सैफसोबतची ती सुंदर तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची ऑनस्क्रीन मुलगी आहे. होय, सैफच्या आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून तिचा डेब्यू होतोय. या अभिनेत्रीचे नाव आहे, आलिया फर्निचरवाला आहे. तिची दुसरी ओळख द्यायची झाल्यास, ती अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. ‘जवानी जानेमन’ या सिनेमात आलिया सैफच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 


खरे तर ‘जवानी जानेमन’मधील या भूमिकेसाठी सुरूवातीला सैफची मुलगी सारा अली खानला विचारणा झाली होती. मात्र तिने वडीलांसोबत काम करण्यास नकार दिला आणि ही भूमिका आलिया फर्निचरवाला हिच्या झोळीत पडली. ‘जवानी जानेमन’चे शूटिंग सुरू होण्याअगोदर आलिया सैफ आणि सिनेमातील इतर कलाकारांसोबत वेळ घालवत आहे. डेब्यू सिनेमामध्ये प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करायचे म्हटल्यावर आलिया मनातून थोडी घाबरली होती. त्यामुळे दिग्दर्शकांनी तिला शूटिंग सुरू होण्याआधी काही काळ  सिनेमातील कलाकारांसोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर आलिया सध्या सैफसोबत वेळ घालवते आहे.


2011 मध्ये सोनी इंटरनॅशनल वाहिनीच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये आलिया झळकली आहे. या शोमध्ये ती आपल्या आईसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.आलिया नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून तिला तिचे मित्रमंडळींनी अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा सल्लाही दिला होता. त्यानुसार, तिचा डेब्यू होतोय. 


  पूजा बेदीने 1994 मध्ये गुएट्टा इब्राहिम फर्निचरवालासोबत लग्न केले होते.  या दोघांना उमर इब्राहिम आणि आलिया इब्राहिम अशी मुली झालीत. लग्नाच्या आठ वर्षांनंतर पूजाने पतीपासून घटस्फोट घेतला होता.  


Web Title: icc cricket world cup saif ali khan enjoys the india vs pakistan match with alaia furniturewalla in manchester
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.