IAS अधिकाऱ्याने केली 'दिल्ली क्राइम 2'मधून अभिनयात एन्ट्री, लॉकडाउनमध्ये बनला युनिटसाठी देवदूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 04:59 PM2020-05-13T16:59:00+5:302020-05-13T16:59:42+5:30

कोरोनाच्या संकटात IAS अधिकारी दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगारांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

IAS officer made an entry in 'Delhi Crime 2', became an angel for the unit in Lockdown! TJL | IAS अधिकाऱ्याने केली 'दिल्ली क्राइम 2'मधून अभिनयात एन्ट्री, लॉकडाउनमध्ये बनला युनिटसाठी देवदूत!

IAS अधिकाऱ्याने केली 'दिल्ली क्राइम 2'मधून अभिनयात एन्ट्री, लॉकडाउनमध्ये बनला युनिटसाठी देवदूत!

googlenewsNext

आइएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी दिल्ली क्राइम'च्या दूसऱ्या सीजनमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता प्रशासक ते अभिनेता असा यशस्वी प्रवास करणाऱ्या या अभिनेत्याने लॉकडाउनच्या काळात आपल्या शोच्या यूनिटसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

प्रशासकीय अनुभव असणारे अभिनेता अभिषेक या काळात एक रोल मॉडल बनले असून ते आपल्या युनिट मधील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांची तीन महिन्यासाठी मदत करणार आहेत. या युनिटमध्ये सहाय्यक कार्यकर्ता आणि अभिनेता यांचा देखील समावेश आहे.


याविषयी बोलताना अभिषेक सिंह म्हणाले की, नेटफ्लिक्स आणि मी, दिल्ली क्राइमच्या आपल्या यूनिटची देखभाल करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ज्यांना आम्ही आर्थिक आणि भावनात्मक रूपाने ओळखतो. आम्ही सर्व दैनिक वेतनधारक आणि आमच्या टीमचे इतर गरजवंत सदस्यांच्या पुढील तीन महिन्यांची जबाबदारी घेत आहोत.


या कठीण काळात आपण त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व काही ठप्प झाले असून हातावर पोट असणारे सर्वच जण आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष करत आहेत, असे सिंह म्हणाले.

यूनिटच्या सदस्यांनी देखील अभिषेक यांच्या या परोपकारी कृतीबद्दल  आभार व्यक्त केले आणि सोशल मीडियावर त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.  


वास्तविक जीवनात आयएएस अधिकारी सर्वाधिक चर्चित ओटीटी शो, दिल्ली क्राइम सीजन 2 मध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. अभिषेक सिंह यांनी आपल्या देशाच्या प्रशासनिक विभागांमध्ये प्रमुख पदांवर काम केले आहे. सध्या ते दिल्लीमध्ये डेप्युटी कमिश्नर पदावर कार्यरत असून त्यांना शिक्षण आणि आरोग्य सेवेतील उत्तम कार्यासाठी त्यांची ओळखले जातात.  दिल्लीमधील एका सरकारी शाळेला त्यांनी दत्तक घेतले आहे  आणि वेळोवेळी तिथल्या विद्यार्थ्यांसाठी ते काम करत असतात.
अभिषेक यांनी राजधानीतील अवैध बांधकामांच्या विरुद्ध कारवाईचे नेतृत्व  केले असून दिल्ली च्या सर्वात लोकप्रिय ऑड-ईवन ट्रैफिक योजना देखील त्यांच्या देखरेखीखाली राबवण्यात आली होती.

Web Title: IAS officer made an entry in 'Delhi Crime 2', became an angel for the unit in Lockdown! TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.