Video: तुला शिकवीन चांगलाच धडा..! छेड काढणाऱ्या चक्क 15 वर्षांच्या मुलाला सुश्मिता सेनने असा दिला दम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 02:13 PM2020-05-11T14:13:34+5:302020-05-11T14:14:08+5:30

सुश्मिता सेनची छेड काढणारा मुलगा फक्त पंधरा वर्षांचा असल्याचं पाहून ती हैराण झाली होती.

I will teach you a good lesson ..! Sushmita Sen, a 15-year-old boy who was teasing | Video: तुला शिकवीन चांगलाच धडा..! छेड काढणाऱ्या चक्क 15 वर्षांच्या मुलाला सुश्मिता सेनने असा दिला दम

Video: तुला शिकवीन चांगलाच धडा..! छेड काढणाऱ्या चक्क 15 वर्षांच्या मुलाला सुश्मिता सेनने असा दिला दम

googlenewsNext

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यात ती गँग रेपबद्दल बोलताना दिसते आहे. या व्हिडिओत सुश्मिता म्हणतेय की, गँग रेपच्या दोषींना कोणतीही दया न दाखवता त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. यासोबतच सुश्मिताने तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.

ती म्हणाली की, एका इव्हेंटमध्ये एका 15 वर्षांच्या मुलाने तिच्यासोबत छेडछाड केली. तिने शांत न राहता त्याला चांगलाच धडा शिकविला.

सुश्मिता सेनने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, जवळपास सहा महिन्यांपूर्वी मी एका पुरस्कार सोहळ्यात गेली होती. तिथे मीडियातील लोक देखील उपस्थित होते. एका पंधरा वर्षांच्या मुलाला वाटले की इथे इतके लोक आहेत तर मला कळणार नाही असे वाटले.

मी तुम्हाला म्हणते की सेल्फ डिफेन्स शिका, जो तुम्हाला अलर्ट करतो. त्यात मी त्याचा हात खेचला आणि जेव्हा मी पाहिले तर तो पंधरा वर्षांचा मुलगा आहे. मी हैराण झाले. त्याचवेळी मी एक्शन घेणार होती. पण तो पंधरा वर्षांचा मुलगा आहे म्हणून मी त्याला सांगितले की, जर मी काही एक्शन घेतली तर तुझे जीवन खराब होईल.

सुश्मिता सेन पुढे म्हणाली की, मात्र आपल्या देशात वयस्कर व्यक्तींसाठी जे आहे, आपल्या देशात छेडछाड चुकीची आहे आणि गँगरेपसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. कोणतीही शंकेशिवाय दया न दाखवता फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. मग तुम्ही शहरातील असाल किंवा गावातील. मी या गोष्टीवर विश्वास ठेवते.

Web Title: I will teach you a good lesson ..! Sushmita Sen, a 15-year-old boy who was teasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.