"लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:26 PM2021-10-18T15:26:57+5:302021-10-18T15:27:54+5:30

Vicky Kaushal: गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चर्चांमध्येच विकीने मौन सोडलं आहे.

i will get engaged soon enough vicky kaushal on rumours about roka with katrina kaif | "लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन

"लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal)  मुख्य भूमिका असलेला 'उरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाच्या यशानंतर विकीचा 'सरदार उधम' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या विकी सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे. या चित्रपटासोबतच विकी त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चर्चांमध्येच विकीने मौन सोडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सरदार उधमच्या स्क्रीनिंगच्या वेळीदेखील ही जोडी एकत्र झळकली होती. इतकंच नाही तर अनेकदा कतरिनाच्या घराबाहेर विकीला स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. इतकंच नाही तर ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या चर्चांवर विकीने मौन सोडत सत्य परिस्थिती सांगितली आहे. एका मुलाखतीत तो बोलत होता.

"अशा प्रकारच्या बातम्या तुमचीच मित्रमंडळी पसरवतात. परंतु, ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी मी नक्की साखरपुडा करेन आणि ती वेळ लवकरच येईल", असं विकीने सांगितलं.

दरम्यान, साखपुड्याची वेळ लवकरच येईल असं म्हणणाऱ्या विकीने नेमका कोणासोबत साखरपुडा करणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. ऑगस्टमध्ये विकी आणि कतरिनाने साखरपुडा केल्याची चर्चा रंगली होती. परंतु, या वृत्ताला कतरिना किंवा विकीने कोणताही दुजोरा दिला नाही.

Web Title: i will get engaged soon enough vicky kaushal on rumours about roka with katrina kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app