घराच्या भीतींमुळे ट्रोल होणाऱ्या हृतिकने आलिशान घरासाठी खर्च केले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:32 AM2021-09-18T11:32:28+5:302021-09-18T11:52:33+5:30

 हृतिकच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली आहे.

Hrithik Roshan’s troll due damp wall in home,he bought this Flat Around 100 Cr | घराच्या भीतींमुळे ट्रोल होणाऱ्या हृतिकने आलिशान घरासाठी खर्च केले इतके कोटी

घराच्या भीतींमुळे ट्रोल होणाऱ्या हृतिकने आलिशान घरासाठी खर्च केले इतके कोटी

googlenewsNext

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हृतिक चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याच्या प्रत्येक खास गोष्टींची अपडेट तो चाहत्यांसह शेअर करत असतो. फोटो व्हिडीओ शेअर केल्यामुळे त्यांच्या आलिशान घराची झलकही पाहायला मिळते. प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात.

बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे. मुंबईतील जुहू परिसरातील प्राईम बीच इमारतीमध्ये हृतिक राहतो. हृतिक सध्या त्याच्या याच घरामुळे ट्रोल होत आहे. हृतिकने त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर होताच नेटीझन्सची नजर घराच्या भींतीवर पडली आणि त्याच गोष्टीचा मुद्दा बनवत त्याला प्रचंड ट्रोल केले गेले.

घराच्या भींतीना ओलावा आल्यामुळे रंग उडाल्याचे दिसत होते. हृतिक रोशनच्या घराचा रंग पावसामुळे गेलाय असे म्हणत वेगवेगळ्या कमेंट केल्या गेल्या.पण तुम्हाला माहिती आहे का ? याच घरासाठी हृतिकने कोट्यावधी रु खर्च केले आहेत. 38,000 स्केफुटचा फ्लॅट असून  या घराची किंमत 97.5 कोटी इतकी असल्याचे बोलले जाते. त्याच्या या घराची खासियत म्हणजे हा फ्लटॅ सी फेसिंग आहे. 


हृतिकच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली आहे. या घराच्या फर्निचरची शॉपिंग हृतिकने आपल्या मेहुणीच्या घरातून केली आहे. याशिवाय विविध देशात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या हृतिकने तिथून खरेदी केलेल्या वस्तूही त्याच्या घरात पाहायला मिळत आहेत. घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. 

यातील काही विचार हृतिकने स्वतः लिहले आहे. याशिवाय हृतिकचा त्याच्या मुलांसह फोटो कोलाजही पाहायला मिळत आहे. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी हृतिकने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

Read in English

Web Title: Hrithik Roshan’s troll due damp wall in home,he bought this Flat Around 100 Cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.