बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या एका चाहत्याने ट्विटर अकाउंटवर आपल्या नवजात बाळाचा फोटो शेअर करत सांगितले की तो अभिनेता हृतिक रोशनचा खूप मोठा चाहता आहे. आता देवाच्या कृपेने त्याच्या मुलाच्या हाताला हृतिकसारखे सहा बोटे पाहून तो खूश झाला आहे आणि आता त्याने त्याच्या मुलाचे नाव हृतिक ठेवणार आहे.
सोशल मीडिया युजरने जसे हे ट्विट करून माहिती दिली तशी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. लोक या पोस्ट लाइक, कमेंट व शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे. हृषिकेश नामक हा व्यक्ती इंफाळला राहणारा आहे.
ऋषिकेश एंगोमसाठी २३ नोव्हेंबर खूप खास दिवस आहे कारण त्या दिवशी त्याच्या घरी एका बाळाचे आगमन झाले आहे. हृषिकेश यांनी सांगितले की, तो हृतिक रोशनचा उत्साही चाहता आहे आणि आपल्या मुलाचे नाव हृतिक ठेवायचा निर्णय घेतला. त्याचा मुलगा सहा बोटांसोबत जन्माला आला आणि हृतिक रोशनच्यादेखील एका हाताला सहा बोटे आहेत. याच कारणामुळे हृषिकेशने आपल्या मुलाचे नाव हृतिक ठेवले.
हृषिकेशने आपल्या ट्विटमध्ये हेदेखील सांगितले की तो आधीपासून हृतिक रोशनचा खूप मोठा चाहता आहे. याच कारणामुळे त्याने त्याच्या नावात एच जोडायचे ठरविले. त्याने त्याचे ऋषिकेश हे नाव बदलून हृषिकेश ठेवले आहे.
हृषिकेश अंगोमच्या पोस्टला ट्विटरवर लाइक्स आणि रिट्विटने व्हायरल झाले आहे.
वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Hrithik Roshan's fan names actor born with six fingers, tweet goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.