War Movie Box Office Collection : ‘वॉर’ची विक्रमी कमाई, दोन दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:58 PM2019-10-04T15:58:55+5:302019-10-04T16:07:46+5:30

War Movie Box Office Collection Day 2 : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

hrithik roshan tiger shroff war film box office collection day 2 | War Movie Box Office Collection : ‘वॉर’ची विक्रमी कमाई, दोन दिवसांत कमावले इतके कोटी

War Movie Box Office Collection : ‘वॉर’ची विक्रमी कमाई, दोन दिवसांत कमावले इतके कोटी

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१९ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचा विचार केल्यास त्यातही ‘वॉर’ ने बाजी मारली आहे.

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी  ५३.३५ कोटींची कमाई करत  अनेक विक्रम मोडीत काढले. आत्तापर्यंत या चित्रपटाने 77.70 कोटींची कमाई केली आहे. अर्थात पहिल्या दिवसाच्या तुलनेत  दुस-या दिवसाच्या कमाईत थोडी घट दिसली. दुस-या दिवशी चित्रपटाने 23.10 कोटींचा बिझनेस केला. 
 एकाचवेळी हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये ‘वॉर’ प्रदर्शित झाला. यापैकी हिंदी भाषेतील हा सिनेमा देशभरातील 3800 स्क्रिन्सवर रिलीज झाला. एकट्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी ५१.६० कोटींचा गल्ला जमवला. तमिळ आणि तेलुगू व्हर्जनने १.७५ कोटी इतकी कमाई केली.




पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत  या चित्रपटाने आठ विक्रम आपल्या नावावर केले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आणि  सर्वाधिक कमाई करणारा राष्ट्रीय चित्रपट असे दोन विक्रम ‘वॉर’ने आपल्या नावावर केलेत. याशिवाय  हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या  करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट असे विक्रमही ‘वॉर’ ने नोंदवले. यशराज फिल्मचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणूनही ‘वॉर’ने विक्रम स्थापित केला.


२०१९ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचा विचार केल्यास त्यातही ‘वॉर’ ने बाजी मारली आहे. पहिल्या दिवशी ५१.६० कोटी कमाई करत या चित्रपटाने सलमानच्या ‘भारत’ला पिछाडले.‘भारत’ने पहिल्या दिवशी ४२.३० कोटींची कमाई केली होती.  

Web Title: hrithik roshan tiger shroff war film box office collection day 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.