ठळक मुद्देनुकतेच कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने  ट्विटरवर केला होता.

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन  एका मुस्लिम तरूणावर प्रेम करते. पण तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या वडिलांनी यामुळे माझ्यावर हात उचलला. तो दहशतवादी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे, असा खुलासा खुद्द सुनैनाने अलीकडे केला होता.  सुनैना सध्या एका जर्नलिस्टला डेट करतेय. रूहैल अमीन असे त्याचे नाव. रूहैल एक काश्मिरी पत्रकार आहे आणि आधीच विवाहित आहे.  आत्तापर्यंत रूहैल या प्रकरणावर मौन बाळगून होता. पण आता त्यानेही सुनैनाच्या बचाव करत रोशन कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

एका न्यूज चॅनलशी बोलताना रूहैलने रोशन कुटुंबावर गंभीर आरोप केलेत. माझ्या धर्मामुळे मला अतिरेकी म्हणणे कदापि योग्य नाही. विशिष्ट धर्माचा असल्यामुळे मला अतिरेकी ठरवले जात असेल तर ते दुर्दैवी आहे. मी याची तीव्र शब्दांत निंदा करतो. माझ्या व सुनैनाच्या नात्याला राकेश रोशन व पिंकी रोशन यांचा विरोध आहे. आमच्या मैत्रीवर त्यांचा आक्षेप आहे. सुनैनाच्या अवतीभवती सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मला मिळतेय. हे सगळे आमच्या मैत्रीमुळे झाले. आधी सुनैनाने मला सांगितले तेव्हा मला विश्वास बसला नाही. मी तिच्या गोष्टीवर केवळ हसलो होतो. पण हे खरे आहे. सुनैना तिचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करू इच्छिते. तिच्या कुटुंबाने तिला पाठींबा द्यावा, एवढीच तिची इच्छा आहे, असे रूहैल यावेळी म्हणाला.

सुनैनाचा भाऊ हृतिक रोशन याने सुजैन खान या मुस्लिम तरूणीची विवाह केला होता. मग तुझ्या व सुनैनाच्या लग्नावर रोशन कुटुंबाला का आक्षेप असावा? असा प्रश्न केला असता, हा दुटप्पीपणा सगळेच बघत आहेत, असे तो म्हणाला.

काय आहे प्रकरण
नुकतेच कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने  ट्विटरवर केला होता.  यानंतर खुद्द सुनैना हिनेही पिंकविला या एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना रंगोलीचा हा आरोप खरा असल्याचे सांगितले .

माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या वडिलांनी यामुळे माझ्यावर हात उचलला. तो दहशतवादी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या कुटुंबाने रूहैलचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासोबत लग्नाबद्दल सध्या मी काहीही सांगू शकत नाही. पण मला त्याच्यासोबत राहायचे आहे. तो मुस्लिम आहे, केवळ यामुळे माझे कुटुंब त्याचा स्वीकार करायला तयार नाही. ते म्हणतात, त्याप्रमाणे तो दहशतवादी असता तर त्याचे फोटो गुगलवर सगळीकडे कसे असते? , असे सुनैनाने यावेळी म्हटले होते. सुनैनाच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.  
 


Web Title: hrithik roshan sister sunaina roshan alleged boyfriend ruhail amin breaks his silence on roshan family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.